breaking-newsटेक -तंत्रताज्या घडामोडीव्यापार

नव्या फीचर्ससह शाओमी ‘हा’ लोकप्रिय स्मार्टफोन रिलाँच करणार

मुंबई – चीनी स्मार्टफोन निर्माता कंपनी शाओमी आपले विविध स्मार्टफोन अनेक वेळा वेगवेगळ्या नावाने लाँच करत असते. कंपनीने बर्‍याच वेळा आपल्या आधीच्या डिव्हाइसचे हार्डवेअर बदलून डिव्हाइस नव्याने लाँच केलं आहे. म्हणजेच हे स्मार्टफोन बाजारात नवीन नावाने रिलाँच करण्यात आले आहेत.

अलीकडेच एका रिपोर्टमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, शाओमी कंपनी त्यांचा 2 वर्षांपूर्वी लाँच केलेला स्मार्टफोन पुन्हा एकदा नव्या फीचर्ससह रिलाँच करणार आहे. अहवालात असे म्हटले आहे की, कंपनी हा फोन रेडमी नोट 8 या नावाने युरोपियन बाजारात लाँच करणार आहे.

हा फोन 2019 मध्ये लाँच करण्यात आलेल्या रेडमी नोट 8 सारखा असणार नाही. नवीन स्मार्टफोनमध्ये गेल्या वर्षी रिलीज झालेला मीडियाटेक हेलियो G85 चिप देण्यात येणार आहे. मात्र, आता या फोनची बॅटरी मागील फोनप्रमाणे केवळ 4000mAh इतकीच असेल. हा स्मार्टफोन MIUI 12.5 सिस्टमसह येईल.

दरम्यान, रेडमी नोट 8 मध्ये 22.5W चा वेगवान चार्ज सपोर्ट देण्यात येणार असल्याचेही या लीक्समधून समोर आले आहे. म्हणजे, पूर्वीच्या 18W चार्जिंगच्या तुलनेत हा फोन अपग्रेड केला गेला आहे. नवीन स्मार्टफोन क्वाड रियर कॅमेरा सेटअपसह येईल. फोनचा मुख्य कॅमेरा 48 मेगापिक्सेलचा असेल. स्टोरेजच्या बाबतीत फोनमध्ये 128 जीबी स्टोरेज देण्यात येईल.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button