breaking-newsपिंपरी / चिंचवड

सांगवी पोलीस ठाण्यातील महिला उपनिरीक्षक एसीबीच्या जाळ्यात

पिंपरी | प्रतिनिधी

बलात्काराचा गुन्हा दाखल न करण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक महिलेने एका व्यक्तीकडे एक लाख रुपयांची लाच मागितली. याबाबत संबंधित व्यक्तीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (एसीबी) दाद मागितली. एसीबीने सापळा रचून सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाला 70 हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले. आपले बिंग फुटल्याचे उघड होताच सहाय्यक उपनिरीक्षक एसीबीच्या पथकाला धक्का देऊन पळून गेला. एसीबीने उपनिरीक्षक महिलेला ताब्यात घेतले आहे.

महिला पोलीस उपनिरीक्षक हेमा सिध्दराम सोळुंके, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अशोक बाळकृष्‍ण देसाई अशी कारवाई झालेल्या पोलिसांची नावे आहेत. याप्रकरणी 42 वर्षीय व्यक्तीने एसीबीकडे तक्रार दिली आहे.

तक्रारदार व्यक्तीच्या विरोधात सांगवी पोलीस ठाण्यात एक अर्ज आला होता. त्या अर्जाची चौकशी उपनिरीक्षक सोळुंके करीत होत्या. अर्जावरून बलात्काराचा गुन्हा दाखल न करण्यासाठी उपनिरीक्षक हेमा सोळुंके यांनी तक्रारदारकडे एक लाख रुपयांची लाच मागितली. त्यानंतर तडजोड करून 70 हजार रुपये देण्याचे ठरले.

याबाबत तक्रारदाराने एसीबीकडे दाद मागितली. एसीबीने 25 आणि 26 नोव्हेंबर रोजी पडताळणी केली आणि 2 डिसेंबर रोजी सापळा लावला. सोळुंके यांनी सहाय्यक उपनिरीक्षक देसाई यांना लाच घेण्यास पाठवले. लाच घेतल्यानंतर एसीबीचे अधिकारी देसाई यांनी पकडण्यासाठी गेले असता एसीबीच्या अधिकाऱ्यांना धक्का देऊन देसाई त्याच्या दुचाकीवरून पळून गेला. एसीबीने उपनिरीक्षक सोळुंके यांना ताब्यात घेतले आहे.

ही कारवाई पोलीस उपअधीक्षक सीमा आडनाईक, पोलीस निरीक्षक भारत साळुंखे, सहाय्यक पोलीस फौजदार शेख, पोलीस कर्मचारी नवनाथ वाळके, वैभव गिरीगोसावी, पूजा पागिरे यांच्या पथकाने केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button