पिंपरी / चिंचवड

महिलेचा विनयभंग, पती-पत्नीस मारहाण : एकास अटक

पिंपरी | प्रतिनिधी

किवळे येथे एका तरुणाने त्याची दुचाकी भरधाव चालवून चुलीवर स्वयंपाक करत असलेल्या महिलेच्या पिठात माती उडवली. याचा जाब विचारल्याने महिलेचा विनयभंग करून महिलेला आणि तिच्या पतीला मारहाण केली. ही घटना सोमवारी (दि. 11) दुपारी साडेपाच वाजता लेखा फार्मच्या मागे किवळे येथे घडली.

सतीश काकासाहेब काकडे (वय 23, रा. उत्तमनगर, किवळे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्यासह त्याची पत्नी किरण आणि एक मित्र (नाव पत्ता माहिती नाही) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि त्यांचे पती सोमवारी रात्री कामावरून घरी आले. फिर्यादी घराबाहेर चूल मांडून स्वयंपाक करत होत्या. त्यावेळी आरोपी सतीश तिथून दुचाकीवरून भरधाव वेगात गेला. त्यामुळे रस्त्यावरील माती उडून फिर्यादी यांच्या चपातीच्या पिठात गेली. याचा फिर्यादी यांनी जाब विचारला. त्यावरून सतीश याने फिर्यादीस शिवीगाळ केली. फिर्यादी यांचे पती शिवीगाळ केल्याचा जाब विचारण्यासाठी आले असता आरोपी सतीश याने फिर्यादी यांचा विनयभंग केला. सर्व आरोपींनी फिर्यादी यांच्या पतीला मारहाण केली. पोलिसांना फोन केला असल्याचे समजताच आरोपी पळून गेले. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button