पिंपरी | प्रतिनिधी
नातेवाईकांच्या घरी कार्यक्रमासाठी आई-वडिलांसोबत गेलेल्या 12 वर्षीय मुलीसोबत एकाने गैरवर्तन करत तिचा विनयभंग केला. याप्रकरणी आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना रविवारी (दि. 10) रात्री साडेआठ ते सोमवारी (दि. 11) मध्यरात्री साडेबारा वाजताच्या कालावधीत थेरगाव येथे घडली.
संतोष जयवंत मोरे (रा. थेरगाव) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पिडीत मुलीच्या आईने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या पतीचे चुलते यांच्या घराची वास्तुशांती असल्याने त्या कार्यक्रमासाठी फिर्यादी, फिर्यादीचे पती आणि त्यांची 12 वर्षीय मुलगी थेरगाव येथे गेले होते. त्यावेळी आरोपीने फिर्यादी यांच्या मुलीला जबरदस्तीने आडबाजूला नेले. तिच्याशी गैरवर्तन करून तिची लैंगिक सतावणूक करत विनयभंग केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.