पिंपरी / चिंचवड

गांजा आणि दारू विक्री प्रकरणी महिलेवर गुन्हा

पिंपरी l प्रतिनिधी

गांजा आणि दारू विकणाऱ्या एका महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने मंगळवारी (दि. 5) दुपारी दीड वाजता म्हातोबानगर झोपडपट्टी, वाकड येथे ही कारवाई केली आहे.

जया सुरेश जठार (वय 42, रा. वाकड) असे गुन्हा दाखल झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस नाईक अजित कुटे यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिला म्हातोबानगर झोपडपट्टी येथे एका टपरी जवळ दारू आणि गांजा विकत असल्याची माहिती अंमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून कारवाई केली. यामध्ये पोलिसांनी 19 हजार रुपयांचा 760 ग्रॅम गांजा आणि दोन हजार 885 रुपयांच्या देशी विदेशी दारूच्या बाटल्या असा एकूण 21 हजार 885 रुपयांचा माल जप्त केला. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button