पिंपरी / चिंचवड

शस्त्र विरोधी पथकाची मोठी कारवाई: मेफेड्रोन ड्रग्ज विक्रीसाठी आलेल्या मुंबईच्या एजंटला मावळात अटक

पिंपरी l प्रतिनिधी

पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या शस्त्र विरोधी पथकाने तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोठी कारवाई केली आहे. मेफेड्रोन ड्रग्ज विक्रीसाठी आलेल्या मुंबईच्या एका एजंटला पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून 27 लाख 20 हजारांचे मेफेड्रोन ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे. ही कारवाई मंगळवारी (दि. 5) सकाळी सव्वा अकरा वाजता करण्यात आली.

नदीम इनायत पटेल (वय 33, रा. मुंब्रा, ठाणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस हवालदार नामदेव वडेकर यांनी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी नदीम पटेल हा तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत आला असल्याची माहिती शस्त्र विरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी मंगळवारी सकाळी सापळा लावून कारवाई केली. सुदवडी गावाजवळ भंडारा डोंगराच्या कमानीजवळ नदीम हा कार मधून आला असता पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.

त्याच्या कारची झडती घेतली असता कार मध्ये तब्बल 27 लाख 20 हजार रुपये किमतीचे 272 ग्रॅम मेफेड्रोन ड्रग्ज आढळले. पोलिसांनी ड्रग्ज, रोख रक्कम, एक कार, मोबाईल फोन असा एकूण 32 लाख 61 हजार 700 रुपयांचा ऐवज जप्त करत नदीम याला अटक केली. तळेगाव एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button