breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीदेश-विदेशराजकारण

‘१९७१ मध्ये पंतप्रधान असतो तर..’; पंतप्रधान मोदींचं मोठं विधान

Narendra Modi | लोकसभा निवडणुकीचा सहावा आणि सातपा टप्पा २५ मे आणि १ जून रोजी पार पडणार आहे. या दोन्ही टप्प्यांचा प्रचार सुरु आहे. पटियालाचे भाजपाचे लोकसभेच्या उमेदवार आणि पंजाबचे माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांच्या पत्नी परनीत कौर यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भाषण केलं. यावेळी पंतप्रधान मोदींनी कर्तारपूरबाबत महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, मी जर १९७१ मध्ये भारत-पाकिस्तान युद्ध झालं त्यावेळी मी जर पंतप्रधान असतो तर आत्मसमर्पण करणाऱ्या ९० हजार पाकिस्तानी सैनिकांना सोडवलं असतं. तसंच पाकिस्तानकडून कर्तारपूर साहेब परत घेतलं असतं.

https://x.com/narendramodi/status/1793692035637244269

हेही वाचा     –      पुढील दोन, तीन दिवस पुण्यासह राज्यातील अनेक शहरांना उष्णतेच्या लाटेचा इशारा 

७० वर्षांपासून आपण करतारपूर साहेब गुरुद्वारा दुर्बिणीतून पाहतो होतो. १९७१ मध्ये हा गुरुद्वारा भारतात येऊ शकत होता. मी जर तेव्हा पंतप्रधान असतो तर ही गोष्ट घडवली असती. काँग्रेसने ही गोष्ट केली नाही. मात्र २०१९ मध्ये आमच्या सरकारने करतापूर साहेब या ठिकाणी जाण्याचा मार्ग खुला केला. त्यामुळे शिख बांधव या ठिकाणी जाऊ शकले, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.

पंजाबमध्ये ड्रग्ज माफिया आणि शूटर्स गँग यांचं राज्य सुरु आहे. मुख्यमंत्री भगवंत मान हे फक्त कागदोपत्री मुख्यमंत्री आहेत. बाकी त्यांना पंजाबच्या परिस्थितीशी काही घेणंदेणं नाही. सगळे मंत्री मजा-मस्ती करत आहेत. अशा परिस्थितीत पंजाबचा विकास कसा होईल? सध्याचं पंजाबमधलं भगवंत मान सरकार हे भ्रष्ट सरकार आहे, असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button