breaking-newsTOP Newsताज्या घडामोडी

बैलपोळा सण का साजरा केला जातो? काय आहे या सणाचे महत्व? जाणून घ्या..

Bail Pola Festival 2023 : दरवर्षी मोठ्या उत्साहात बैलपोळ्याच्या सण साजरा केला जातो. श्रावण अमावस्याच्या दिवशी बैलपोळा हा साजरा केला जातो. या दिवसाला पिठोरी अमावस्या देखील म्हणतात. पोळ्याच्या दिवशी वर्षभर शेतात राबणाऱ्या बैलाला नागरापासून किंवा शेतीपासून आराम दिला जातो. बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा हा सण आहे. महाराष्टात मोठ्या प्रमाणात बैल पोळ्याचा सण साजरा केला जातो.

फक्त महाराष्टात नाही तर महाराष्ट्राच्या सीमेवर असणाऱ्या मध्यप्रदेश आणि तेलंगणा सीमा भागात ही हा सण साजरा केला जातो. या वर्षी १४ सप्टेंबर गुरुवारी बैलपोळ्याचा सण साजरा केला जाणार आहे. तर बैलपोळ्याच्या सण हा नेमका का साजरा केला जातो? शेतकऱ्याच्या दृष्टीने बैलपोळ्याचे काय महत्व आहे? याची माहिती आपण जाणुन घेऊया.

हेही वाचा – ग्राऊंड रिपोर्ट: आगामी निवडणुकीसाठी राजकीय पक्षांच्या ‘जोर बैठका’

बैलपोळ्याचे महत्व..

बैलपोळा सण शेतकऱ्यांसाठी अत्यंत उत्साहाचा असतो. शेती हा व्यवसाय मोठ्या प्रमाणात बैलांवर अवलंबून आहे. त्यामुळे बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी बैलपोळा हा सण साजरा केला जातो. या दिवशी बैलाची पूजा करून त्याची मिरवणूक काढली जातो. महिला घरामध्ये मातीच्या बैलांची पूजा करून पूजा करतात. या दिवशी बैलांना गोड-धोड नैवैद्यसह वेगवेगळे पदार्थ बनवतात.

पौराणिक कथा :

पौराणिक कथेनुसार, प्रभू विष्णू हे कृष्णाच्या रूपात धर्तीवर अवतरले तेव्हापासून कृष्णाचा मामा कंसने कृष्णाचे प्राण घेण्यासाठी प्रयत्न सुरू केले. एकदा कंसाने कृष्णाचा वध केला. तो दिवस श्रावण अमावस्येचा होता. या दिवशी पोळा सण साजरा करण्यात येतो. याच दिवशी पिठोरी अमावस्या देखील असते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button