breaking-newsTOP Newsताज्या घडामोडी

५ सप्टेंबरलाच शिक्षक दिन का साजरा केला जातो? वाचा संपूर्ण इतिहास!

Teachers Day 2023 : `गुरु ब्रह्मा, गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः। गुरुः साक्षात परब्रह्म तस्मैः श्री गुरुवेः नमः।` भारतीय संस्कृतीत आईनंतर सर्वांत महत्त्वाचे स्थान आहे ते गुरुला. आई जशी मुलांवर संस्कार करते, तसा गुरु हा मुलांना घडवण्याचे, त्यांना सक्षम करण्याचे काम गुरु करतो. चला तर मग जाणून घ्या शिक्षक दिनाचा इतिहास आणि महत्त्व…

शिक्षक दिनाचा इतिहास : डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म ५ सप्टेंबर१८८८ रोजी झाला. ते एक विद्वान शिक्षक होते. त्यांनी आपल्या आयुष्यातील ४० वर्षे शिक्षक म्हणून भारताचे भविष्य सुधारण्यात घालवले. शिक्षक म्हणून त्यांचे योगदान आणि मोलाचे काम लक्षात राहील म्हणून प्रत्येक वर्षी त्यांचा वाढदिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो.

हेही वाचा – रांजणगाव येथे ‘इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर’; केंद्राकडून पहिल्या टप्प्यात ६२ कोटींचा निधी वर्ग

शिक्षक दिनाचे महत्त्व : विद्येविना मती गेली । मतीविना नीती गेली नीतीविना गती गेली । गतीविना वित्त गेले । वित्ताविना शूद्र खचले । इतके अनर्थ एका अविद्येने केले ।।, असे महात्मा ज्योतिबा फुले यांनी म्हटलेच आहे. यावरून शिक्षणाची महती अधोरेखित होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button