breaking-newsताज्या घडामोडीपुणेराजकारण

नेहमी बोलणाऱ्या सुप्रिया सुळे पुणे अपघातावर गप्प का ? अग्रवाल कुटुंबाशी संबंध आहेत का ? नितेश राणेंचा सवाल

पुणे : पुण्यातील कल्याणीनगर येथे झालेल्या कार अपघातातर वातावरण चांगलंच तापलं आहे. एका बिल्डरच्या अल्पवयीन मुलाने दारूच्या नशेत कार चालवून बाईकला धडक दिली आणि त्यामध्ये दोघांना जीव गमवावा लागला. या घटनेमुळे पुण्यातीलच नव्हे देशभरातील नागरिकांनी व्यक्त करत दोषीला कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे.

या प्रकरणात विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी आपली पोळी भाजून घेतली असून आरोप-प्रत्यारोपांचे राजकारण रंगले आहे. पुण्यात एकीकडे रवींद्र धंगेकर आणि मुरलीधर मोहोळ यांच्यातही वाद रंगल्याचे दिसत असून धंगेकरांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांवरही आरोप केले होते. मात्र आता भाजप नेते नितेश राणेंनी याप्रकरणात उडी घेत थेट राष्ट्रवादीच्या नेत्या, सुप्रिया सुळे यांच्यावर निशाणा साधत टीका केली.

हेही वाचा – Pimpri Chinchwad | २४ अनधिकृत जाहिरात धारक, आतापर्यंत २० फलकांवर निष्कासनाची कारवाई 

नेहमी बोलणाऱ्या सु्प्रिया सुळे या पुणे अपघातावर गप्प का आहेत ? असा सवाल नितेश राणे यांनी विचारला आहे. शरद पवार गटातून या घटनेवर प्रतिक्रिया का येत नाही ? सुप्रिया सुळे आणि अग्रवाल कुटुंबाचे संबंध आहेत का ? असा प्रश्नही नितेश राणे यांनी उपस्थित केला. पुण्यातील अपघाताच्या या प्रकरणावरून नितेश राणेंनी सुप्रिया सुळेंना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे.

‘ नेहमी बोलणाऱ्या सुप्रिया सुळे ताई गप्प का आहेत ? शरद पवार गटातून याबद्दल काहीच प्रतिक्रिया का व्यक्त होत नाही ? प्रत्येक गोष्टीवर, उठसूठ देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा मागणाऱ्या सुप्रिया सुळे या पुण्याच्या घटनेवर मात्र गप्प का ? त्यांचे या घटनेतील कुटुंबाशी संबंध होते का ? त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला जात आहे का ? कारण आरोपीला जो वकील देण्यात आला आहे, तो पवार साहेबांच्या अतिशय निकटवर्तीय असल्याचे समजते,’ असा आरोप नितेश राणे यांनी केला.

दरम्यान या घटनेवर महाराष्ट्र नवनिर्माण सेना सोडून वंचित बहुजन आघाडीमध्ये आलेल्या वसंत मोरे यांनी मत नोंदवलं आहे. कोरेगाव पार्क मध्ये जो अपघात झाला, तो दुर्देवीच होता. पण त्यामागून जे राजकारण चालू दिसतंय त्यामध्ये आपल्या पुण्याच्या काही नेत्यांची कीव येते असं वसंत मोरे म्हणाले. नाईट लाईफ काय फक्त कोरेगाव पार्क मध्येच आहे का? ज्यांनी पुढाकार घेऊन कारवाया लावल्या, त्या कोथरूडमधील पुढाऱ्यांनी जरा आपल्या भागातील नाईट लाईफ विषयी लक्ष द्यावे असंही त्यांनी नमूद केलं.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button