breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी चिंचवडमधील अनधिकृत शाळांचा सर्व्हे सुरु

  • 15 जूनपर्यंत अनधिकृत शाळांची यादी जाहीर करणार

पिंपरी, ( महा ई न्यूज ) – पिंपरी चिंचवड शहरात अनधिकृत शाळांचे पेव वाढले आहे. अनेक इंग्रजी माध्यमांच्या खासगी शाळा सुरु होवु लागल्या आहेत. त्या शाळांना महापालिका शिक्षण विभागासह राज्य शासनाची देखील परवानगी घेतलेली नसते. त्या शाळांमध्ये पालक आपल्या पाल्याचा प्रवेश घेवू नये, म्हणून अनधिकृत शाळांचा सर्व्हे सुरु केला असून 15 जूनपर्यंत शाळांची यादी जाहीर करण्यात येणार आहे, अशी माहिती प्रशासन अधिकारी ज्योत्स्ना शिंदे यांनी दिली.

पिंपरी चिंचवड शहरामध्ये काही खासगी प्राथमिक शाळा बिनदिक्कतपणे सुरू आहेत. शासनाची कोणतीही परवानगी न घेता या शाळांनी राजरोसपणे धंदा मांडला आहे. या अनधिकृत शाळा बंद करण्यासाठी त्या संबंधित शाळेच्या संस्थांना दरवर्षी नोटीसही बजावल्या जात आहेत. मात्र या नोटिशीकडे दुर्लक्ष करत या शाळा अनधिकृतरीत्या सुरु आहेत.  महापालिकेच्या हद्दीत गतवर्षीच्या तब्बल एकूण १८ शाळा अनधिकृतपणे चालविल्या जात असून पालकांकडून या शाळा वारेमाप फी गोळा करुन त्यांची फसवणूक शाळेकडून होत आहे.

संबंधित शाळांना नोटीस बजावून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश पर्यवेक्षकांना दिलेले होते. शहरातील या अनधिकृत शाळांमध्ये पालकांनी आपल्या पाल्याचा प्रवेश घेऊ नये. या शाळांमध्ये प्रवेश घेतल्यास होणा-या नुकसानीस महापालिका शिक्षण विभाग जबाबदार राहणार नाही, असेही शिक्षण विभागाने यापुर्वीच स्पष्ट केलेले आहे.

दरम्यान, यंदाच्या शैक्षणिक वर्षात अनधिकृत शाळांचे सर्व्हे सुरु केला आहे. त्या सर्व्हेतून पिंपरी चिंचवड शहरात किती अनधिकृत शाळा आहेत. हे आढळून चाैकशीअंती समोर येईल. त्या शाळांची यादीही जाहीर करण्यात येईल. त्या अनधिकृत शाळेत प्रवेश घेतल्यास पाल्याच्या होणाऱ्या शैक्षणिक नुकसानीस स्वताः पालक जबाबदार राहतील, तसेच संबंधित शाळांना सुरुवातील नोटीस देवून त्यांच्यावर एक लाख रुपये दंडात्मक कारवाई करण्यात येईल, त्यानंतरही शाळा सुरु राहिल्यास संबंधिताना दरदिवशी 10 हजार रुपये प्रमाणे दंड आकारण्यात येणार आहे. याशिवाय संबंधित अनधिकृत शाळांवर १९ आक्टोबर २०१० च्या कायद्यानुसार कारवाई येणार आहे. असेही शिंदे यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button