breaking-newsTOP Newsताज्या घडामोडी

भारतीय नौदल दिन ४ डिसेंबरलाच का साजरा केला जातो? वाचा सविस्तर..

Indian Navy Day : दरवर्षी ४ डिसेंबरला भारतीय नौदस दिन साजरा केला जातो. तीन हजार वर्षांपासून इतिहासातील विविध राजे-घराणे इथपासून छत्रपती शिवाजी महाराज यांचे नौदल ते पुढे सध्याचे आधुनिक नौदलाने असा भारतीय नौदलाचा दबदबा राहिला आहे.
विशेषत: १९७१ मध्ये भारतीय नौदलाने पाकिस्तान विरूद्धच्या युद्धात कराची बंदरावर केलेला यशस्वी हल्ला, विशाखापट्टणवरचा हल्ला परतवण्यात मिळवलेले यश आणि पूर्व पाकिस्तान नेव्हीचे उच्चाटन करण्यात बजावलेली महत्त्वपूर्ण कामगिरी याच्या स्मरनार्थ ४ डिसेंबरला नौदल दिन साजरा केला जातो.

१९७१ या वर्षाच्या सुरुवातीपासून भारत पाकिस्तानमधील संबंध ताणले गेले होते. तीन डिसेंबरच्या संध्याकाळी पाकिस्तानने पश्चिमेकडील भारताच्या हद्दीत वायू दलाच्या विविध तळांवर हल्ले केले आणि युद्धाला सुरुवात केली. ४ डिसेंबरच्या रात्री भारताच्या युद्धनौकांचा समूह पाकिस्तानच्या युद्दनौकांना, रडार यंत्रणांना चकवत कराची बंदरापासून सुमारे ४६० किलोमीटर अंतरावर येऊन स्थिरावला. या समुहात तीन विद्युत वर्गातील क्षेपणास्त्रवाहू युद्धनौका (Vidyut-class missile boat-INS Nipat, INS Nirghat and INS Veer), दोन कॉर्वेट (Corvette) प्रकारातील युद्धनौका (INS Kiltan and INS Katchall) आणि इंधनवाहू टँकर (INS Poshak ) यांचा समावेश होता.

रात्री हळूहळू नियोजित पद्धतीने युद्धनौकांनी कराचीकडे आगेकूच करायला सुरुवात केली. किनाऱ्यापासून ७० किलोमीचर अंतरावर INS Nirghat ने क्षेपणास्त्र डागत PNS Khaibar या पाकिस्तानच्या युद्धनौकेला जलसमाधी दिली. INS Nipat या युद्धनौकेने क्षेपणास्त्र हल्ला करत PNS Shah Jahan नावाच्या युद्धनौकेचे नुकसान केले आणि एका मालवाहू जहाजाला बुडवले. INS Veer ने क्षेपणास्त्र डागत PNS Muhafiz ही युद्धनौका बुडवली. INS Nipat पुढे आगेकूच करत कराची बंदराजवळ अवघ्या २६ किलोमीटर एवढ्या अंतरावर पोहचत क्षेपणास्त्र डागली, ज्यामध्ये बंदरातील इंधन साठ्याचे मोठे नुकसान झाले. या संपूर्ण मोहिमेला Operation Trident असं नाव देण्यात आले होते.

हेही वाचा  –  ‘महादेवा, मला मंत्री करा’; शिंदे गटाचे आमदार भरत गोगावलेंचं साकडं 

एवढंच नाही तर असा हल्ला केल्यावर पुन्हा चार दिवसांनी म्हणजेच आठ-नऊ डिसेंबरच्या रात्री Operation Python मोहिम राबवत भारतीय नौदलाच्या तीन युद्धनौकांनी कराची बंदरावर पुन्हा हल्ला करत पाकिस्तानच्या एका इंधनावाहू युद्धनौकेचे नुकसान केले तर कराची बंदरातील आणखी एका इंथन साठा उद्ध्वस्त केला. या दणक्याने पाकिस्तान त्याचे नौदल हे पश्चिम भागातच म्हणजे कराची बंदराच्या आसपास ठेवू शकला, कराची बंदरात पाकिस्तानच्या युद्धनौकांना इंधनाची मोठी कमतरता जाणवली, त्यांना पुढे सरकता आले नाही. त्यामुळेच दुसरीकडे पूर्व पाकिस्तान (आत्ताचे बांगलादेश) च्या समुद्रात भारतीय नौदलाला पुर्णपणे वर्चस्व राखण्यास एकप्रकारे मदत झाली.

जगातील नौदलांच्या इतिहासात ४ डिसेंबर १९७१ चा भारतीय नौदलाने कराची बंदरावर केलेला हल्ला ही एक धाडसी कारवाई मानली जाते. १९७१ च्या पाकिस्तान विरुद्धच्या युद्धामधील विजयात ते एक सोनेरी पान आहे. यामुळेच १९७२ पासून ४ डिसेंबर हा दिवस भारतीय नौदल दिन म्हणून साजरा केला जातो.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button