breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

ट्रेकिंग करताना मुंबईतील तरुण बदलापूरच्या चंदेरी गडावरून दरीत कोसळला अन् २२ तासांनी…

बदलापूर |

बदलापूरच्या चंदेरी गडावरून एक २२ वर्षीय तरुण दरीत कोसळल्याची ( trekker falls into gorge ) घटना बुधवारी दुपारी घडली होती. या तरुणाला तब्बल २२ तास चाललेल्या रेस्क्यू ऑपरेशननंतर सुखरूप वाचवण्यात आलंय. त्याच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

बदलापूरच्या जवळ चंदेरी गडावर बुधवारी मुंबईच्या मुलुंडहून ७ जण ट्रेकिंगसाठी आले होते. यापैकी विराज म्हस्के हा २२ वर्षीय तरुण गुहेजवळून पाय घसरून दरीत कोसळला. त्याला वाचवण्यासाठी बदलापूरची नेचर एक्सप्लोरर रेस्क्यू टीम योगेश साखरे यांच्या नेतृत्त्वाखाली गडावर पोहोचली. मात्र विराज हा दरीत कोसळला होता आणि त्याचा पाय फ्रॅक्चर झाला होता. त्यामुळे त्याला तिथून बाहेर काढणं आव्हानात्मक काम होतं. त्याला बेस कॅम्पच्या चिंचवली गावात आणण्यासाठी तब्बल २२ तास रेस्क्यू ऑपरेशन करावं लागलं.

यानंतर चिंचवली गावातून त्याला १०८ रुग्णवाहिकेनं उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात आणि तिथून खासगी रुग्णालयात हलवण्यात आलं. विशेष म्हणजे विराज याला जखमी अवस्थेत गडावरून खाली आणणार असल्यानं १०८ रुग्णवाहिकेत असलेल्या डॉक्टर क्षितिजा खरे आणि श्रद्धा खरे या चिंचवली गावात मुक्कामाला राहिल्या. आज विराजला बेस कॅम्पला आणताच डॉक्टर क्षितिजा आणि श्रद्धा यांनी त्याच्यावर प्राथमिक उपचार केले आणि पुढील उपचारांसाठी त्याला मध्यवर्ती रुग्णालयात दाखल केलं.

या रेस्क्यू ऑपरेशनमध्ये चिंचवली गावातील ग्रामस्थ, पोलीस पाटील, बदलापूर ग्रामीण पोलीस आणि स्थानिक प्रशासन यांनीही समन्वय राखत काम केलं. त्यामुळं विराज म्हस्के याला चंदेरी गडावरून सुखरूप खाली आणण्यात यश आलं. सध्या चंदेरी गडावर जाणाऱ्या ट्रेकर्सची संख्या वाढली आहे. मात्र, अनेकदा नवखे किंवा हौशी ट्रेकर्स यांच्यासोबत एखादा अपघात घडणे, वाट चुकणे असे प्रकार घडत असतात. त्यात चंदेरी गड हा अतिशय कठीण असल्यानं बेस कॅम्पच्या गावातून गाइड घेऊन मगच गडावर जाण्याची गरज आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button