breaking-newsटेक -तंत्रताज्या घडामोडी

WhatsApp स्टेटसमधले आवडलेले फोटो आणि व्हिडीओ सेव्ह करा तेही फिचर शिवाय…

सध्या व्हॉट्सअ‍ॅप हे फक्त चॅटिंगसाठीच नाही तर, त्यावर ठेवलेले स्टेटससाठी जास्त युज केलं जात. स्टेटसमध्ये फोटो आणि व्हिडीओ अपलोड केल्यानंतर ते 24 तास असतात. कधी कधी आपल्याला मित्र-मैत्रिणींचं स्टेटस अनेकदा आवडतात आणि ते सेव्ह करण्याची इच्छा होते. मात्र सेव्ह करण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅपने कोणतही फीचर दिलेलं नाही. मग आपल्याला त्या फ्रेंडकडे सारखे सारखे स्टेटसवरील फोटो आणि व्हडिओ मागावे लागतात…पण आता फोनमध्येही आपण स्टेटस सेव्ह करू शकतो व्हॉट्सअ‍ॅप फिचर शिवाय….जाणून घेऊयात कशा पद्धतिने आपण स्टेटस सेव्ह करू शकतो .

सर्वप्रथम प्ले स्टोरवरून फोनमध्ये Google Files अ‍ॅप डाऊनलोड करा.

अ‍ॅप ओपन केल्यावर टॉप राईट कॉर्नरला देण्यात आलेल्या मेन्यू ऑप्शनवर क्लिक करा.

Settings ऑप्शनमध्ये जा. Show hidden files ऑन करा.

Show hidden files ऑन करा.

अ‍ॅपमध्ये पुन्हा जाऊन खाली देण्यात आलेल्या ब्राऊजरवर टॅप करा. टॅप केल्यावर Internal Storage मध्ये जा.

WhatsApp नावाच्या फोल्डरमध्ये जाऊन Media वर क्लिक करा.

Statuses असं एक फोल्डर दिसेल. त्यामध्ये आपल्या मित्रमैत्रिणींचे व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस दिसतील. फोटो अथवा व्हिडीओ ओपन करायचा असल्यास नावापुढे डाऊनलोडच्या चिन्हावर क्लिक करा.

अनेक ऑप्शन दिसतील. ज्यामध्ये Copy To ऑप्शन सिलेक्ट करा.

Internal Storage मध्ये क्लिक करून हवे असलेले फोटो आणि व्हिडीओ फोनमध्ये सेव्ह करा.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button