breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीदृष्टीक्षेपपश्चिम महाराष्ट्रपुणेमहाराष्ट्रराजकारण

विचारधारा कोणतीही असली तरी सर्वांचे ध्येय देशाला पुढे घेऊन जाणे हेच: खासदार अॅड. वंदना चव्हाण यांचे मत

पुण्यात मैत्री बॉक्स प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन

पुणे : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला राज्यघटना दिली. त्यामध्ये सर्वधर्म समभाव, समतेचा संदेश दिलेला आहे. खऱ्या अर्थाने आपण ते विसरून चाललोय की काय? असा प्रश्न आज पडतो. अशा  काळात मैत्री बॉक्स प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धा अतिशय महत्वाची आहे. सध्याच्या धकाधकीच्या जीवनात सामाजिक, राजकीय क्षेत्रातील व्यक्तींना एकमेकांना भेटायला जमात नाही, खेळ तर दूरची गोष्ट आहे.  मात्र या स्पर्धेच्या निमित्ताने आजच्या सामाजिक – राजकीय गढूळलेल्या वातावरणात विविध विचाराधारेचे कार्यकर्ते आणि पत्रकार एकत्र येत आहे ही आनंदाची बाब आहे. विचारधारा कोणतीही असली तरी सर्वांचे ध्येय देशाला पुढे घेऊन जाणे हेच आहे. या स्पर्धेच्या निमित्ताने हे काम खेळाच्या माध्यमातून होतेय  असे मत  राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या नेत्या, राज्यसभा  खासदार अॅड. वंदना चव्हाण यांनी व्यक्त केले. 

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भीम योद्धा फाउंडेशन आयोजित क्रिएटिव्ह फाउंडेशन आणि छत्रपती कलाकार लीग निमंत्रित स्वर्गीय डी.बी देवधर स्मरणार्थ मैत्री बॉक्स प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी खासदार अॅड. वंदना चव्हाण बोलत होत्या. याप्रसंगी आमदार माधुरी मिसाळ, भाजपा शहराध्यक्ष जगदीश मुळीक, शिवसेना शहराध्यक्ष नाना भानगिरे, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळा चे मेघराज राजेभोसले, नगरसेविका मंजुश्री संदीप खर्डेकर,आर पी आय प्रदेश सचिव ऍड अर्चिता मंदार जोशी,काँग्रेस आय प्रदेश उपाध्यक्ष संगीता तिवारी ,राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश प्रवक्ता ऍड रुपाली पाटील, युवासेनेचे किरण साळी, आयोजक ॲड मंदारभाऊ जोशी- भीमयोद्धा फाउंडेशन, संदीप खर्डेकर- क्रिएटिव्ह फाउंडेशन, रमेश परदेशी- छत्रपती कलाकार लीग आदि मान्यवर उपस्थित होते. 

याप्रसंगी बोलताना आमदार माधुरी मिसाळ म्हणाल्या, भीमयोद्धा फाउंडेशनने या स्पर्धेच्या निमित्ताने विविध राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांना एकत्र आणले आहे. आजच्या राजकीय परिस्थितिमध्ये ही बाब खूप गरजेचे आहे, 

मैत्री बॉक्स प्रीमियर लीग क्रिकेट  या स्पर्धेत भाजप, शिवसेना, कॉँग्रेस, राष्ट्रवादी कॉँग्रेस, शिवसेना ठाकरे गट,  रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, मनसे, मराठी उद्योजक, सामाजिक कार्यकर्ते, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, पत्रकार आणि कलाकार यांच्या टीम सहभागी असून ही स्पर्धा  गेम ऑन स्पोर्ट्स ग्राऊंड, म्हात्रे पुलाजवळ, कर्वेनगर, कोथरूड येथे  ३१ मे पर्यन्त सायंकाळी ६ ते रात्री १० या वेळेत सुरू आहे.
या स्पर्धेची फायनल मॅच आणि बक्षीस समारंभ व समारोप बुधवार ३१ मे २०२३ रोजी सायंकाळीं ६:३० वा  पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि अभिनेते सुबोध भावे यांच्या सह सर्व पक्षीय प्रमुख यांचे उपस्थितीत होणार आहे.  असे भीमयोद्धा फाउंडेशनचे अध्यक्ष अॅड. मंदार जोशी आणि क्रिएटिव्ह फाउंडेशन चे संदिप खर्डेकर यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button