breaking-newsआरोग्यताज्या घडामोडीमुंबई

करोना लशींमुळे पक्षाघाताचा धोका किती?

  • लसीकरणाचे फायदेच अधिक; ‘लॅन्सेट’मधील संशोधनाचे निष्कर्ष

मुंबई |

चीनने तयार केलेल्या करोनाव्हॅक या लशीचे फायदे तोट्यांपेक्षा अधिक आहेत, पण काही रुग्णांत चेहऱ्याचा पक्षाघात झाल्याचे निष्पन्न झाले आहे. पण नंतर त्याची लक्षणे कमी होत जातात असे दी लॅन्सेट इनफेक्षियस डिसीजेस जर्नल या नियतकालिकाने एका अभ्यासात म्हटले आहे. हाँगकाँग विद्यापीठाच्या संशोधकांनी म्हटले आहे की, दर १ लाख लोकांमागे ४.८ लोकांना चेहऱ्याच्या पक्षाघाताचा धोका असतो. करोनाव्हॅक ही निष्क्रिय विषाणूपासून केलेली लस आहे, त्यामुळे चेहऱ्याच्या एका भागाला बेल्स पाल्सी या चेहऱ्याच्या पक्षाघाताचा धोका असतो. त्याची लक्षणे सहा महिन्यांत नष्ट होतात. त्यासाठी कुठले उपचार करावे लागत नाहीत. कॉर्टिकोस्टेरॉइडसच्या मदतीने उपचारांपेक्षा लस देणे केव्हाही चांगले. त्यामुळे जास्त फायदे होतात असे संशोधकांचे म्हणणे आहे.

हाँगकाँग विद्यापीठाचे प्रा. आयन शी केई वाँग म्हणाले की, अभ्यासात बेल्स पाल्सीचे कमी रुग्ण दिसून आले. करोनाव्हॅक लशीमुळे फार थोड्या लोकांमध्ये बेल्स पाल्सीची लक्षणे दिसतात. बेल्स पाल्सी हा दुर्मीळ रोग असून त्यांचे तात्पुरते दुष्परिणाम दिसून येतात. आतापर्यंतच्या पुराव्यानुसार लोकांना लशीचा फायदाच अधिक झाला आहे. बेल्स पाल्सीचे अतिशय कमी रुग्ण चाचण्यांमध्ये दिसून आले. करोनाव्हॅक ही एमआरएनए लस असून याबाबत अधिक संशोधनाची गरज आहे.

चीनच्या करोनाव्हॅक व  फायझर व बायोएनटेकच्या  बीएनटी १६२बी२ या लशीवर दुष्परिणांमाबाबत हाँगकाँग विद्यापीठात अभ्यास करण्यात आला असून त्यात लशीची मात्रा घेतल्यानंतर पहिल्या ४२ दिवसांत  बेल्स पाल्सीची लक्षणे किती जणात दिसली याची नोंद घेण्यात आली. २३ फेब्रुवारी २०२१ व ४ मे २०२१ दरम्यान अशा प्रकारचे २८ रुग्ण ४ लाख ५१ हजार ९३९ लस लाभार्थ्यांमध्ये सापडले होते. हे प्रमाण करोनाव्हॅकच्या पहिल्या मात्रेनंतरचे आहे. बीएनटी १६२बी २ लशीनंतर ५ लाख ३७ हजार २०५ जणांमध्ये १६ जणांना बेल्स पाल्सी होता. जगात १ लाख लोकांमध्ये १५-३० रुग्ण या रोगाचे असतात. करोनाव्हॅकमध्ये या रोगाची जोखीम २.४ पट असते तर बीएनटी १६२ बी२ म्हणजे फायझरच्या लशीत हा धोका कमी म्हणजे लाखात दोन इतका आहे.

फायझर, मॉडर्ना लशींचाही अभ्यास

अमेरिकेच्या संघराज्य औषध प्रशासनाने असे म्हटले आहे की, त्यांच्या फायझर बायोएनटेक व मॉडर्ना या लशींमध्ये असे परिणाम दिसून आलेले नाहीत, पण युरोपीय वैद्यकीय संस्थेने मात्र असे परिणाम या दोन लशींमध्येही दिसून आल्याचे म्हटले होते. करोनाव्हॅक लशीच्या सध्याच्या माहितीमध्ये बेल्स पाल्सी या रोगाचा उल्लेख दुष्परिणामांत केलेला नाही. असे असले तरी तसा उल्लेख करण्यासाठी परवानगी घेण्यात येत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button