breaking-newsTOP Newsआरोग्यताज्या घडामोडीमहाराष्ट्र

54 दिवसांपासून आठवड्याचा पॉझिटिव्हीटी रेट 3 टक्क्यांपेक्षा कमी

पिंपरी चिंचवड | भारतात गेल्या 24 तासांत 35 हजार 178 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे तर, 37 हजार 169 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. मागील 54 दिवसांपासून देशाचा आठवड्याचा पॉझिटिव्हीटी रेट 3 टक्क्यांपेक्षा कमी आहे. तर, 24 दिवसांपासून दैनंदिन पॉझिटिव्हीटी रेट 3 टक्क्यांपेक्षा कमी आहे.आरोग्य मंत्रालयाच्या हवाल्याने एएनआयने याबाबत आकडेवारी प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, देशातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 3 कोटी 22 लाख 85 हजार 857 एवढी झाली आहे. त्यापैकी 3 कोटी 14 लाख 85 हजार 923 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

सध्याच्या घडीला देशात 3 लाख 67 हजार 415 ॲक्टिव्ह कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. भारतात आजवर 4 लाख 32 हजार 519 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. गेल्या 24 तासांत देशभरात 440 रुग्ण कोरोनामुळे मृत्यूमुखी पडले आहेत. देशाचा कोरोना मृत्यूदर 1.33 टक्के एवढा आहे तर, रिकव्हरी रेट 97.52 टक्के एवढा आहे.

देशात आजवर 49 कोटी 84 लाख 27 हजार 083 चाचण्या पूर्ण झाल्या आहेत तर, गेल्या 24 तासांत 17 लाख 97 हजार 559 नमूने तपासण्यात आले आहेत. आयसीएमआरने याबाबत आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.

56 कोटी नागरिकांनी घेतली कोरोना प्रतिबंधक लस
लसीकरण कार्यक्रमाअंतर्गत देशात आत्तापर्यंत 56 कोटी 06 लाख 52 हजार 030 नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली आहे. त्यापैकी 43 कोटी 52 लाख 53 हजार 213 जणांनी लसीचा पहिला डोस घेतला असून, 12 कोटी 48 लाख 41 हजार 368 जणांनी लसीचा दुसरा डोस घेतला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button