breaking-newsTOP Newsटेक -तंत्रताज्या घडामोडी

मेटाव्हर्स म्हणजे काय? तुम्ही वर्तमान जग विसरून जाल आभासी जगात?

Metaverse : आपले तंत्रज्ञान एवढे पुढे गेले आहे की आपण आता मेटाव्हर्सच्या जगात पाऊल ठेवले आहे. ज्यामध्ये आपल्याला वर्तमान जगासोबाबतच आभासी जगाचा देखील अनुभव घेता येणार आहे. तर आज आपण या लेखाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत की मेटाव्हर्स हे प्रकरण नेमकं काय आहे? तसेच हे तंत्रज्ञान आल्यानंतर आपण खरंच आता जगत असलेलं जग आणि आभासी जग यातील फरक विसरून जाऊ का? याबाबत जाणून घेऊयात.

मेटाव्हर्स हे प्रकरण आहे काय?

इंटरनेटमध्ये आपण दिवसेंदिवस विकास होताना पाहत आहोत. इंटरनेट हे कायमच नवनवीन टप्प्यांवर जात आहे. इंटरनेटच्या या विकासालाच मेटाव्हर्स असे म्हणता येईल. मेटाव्हर्समध्ये आपण जगत असलेल्या जगाला आभासी स्वरूप देण्यात आले आहे. मेटाव्हर्सच्या या आभासी जगात तुम्हाला तुमच्यासह इतरांचा आभासी अवतार पाहायला मिळणार आहे.

विशेष म्हणजे या आभासी 3D प्रतिकृतीशी तुम्ही संवाद देखील साधू शकणार आहात. तसेच या आभासी प्रतिकृतीला तुम्ही भेटू देखील शकता. त्यासाठी तुमच्याकडे व्हर्चुअल रिऍलिटी असणारा हेडसेट असणे गरजेचे आहे. सध्याचा विचार केला तर जगभरातील अनेक कंपन्या या मेटाव्हर्स तंत्रज्ञानामध्ये अब्जावधी डॉलरची गुंतवणूक करत आहेत. कारण या सर्व कंपन्यांना माहित आहे की सोशल मीडियाचे पुढील भविष्य हे मेटाव्हर्स हेच आहे.

हेही वाचा – बीडमध्ये मराठा आंदोलकांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदाराचं घर पेटवलं

मेटाव्हर्सच्या जगात नेमकं काय आहे?

आपण आपल्या कोणत्या मित्राला किंवा इतर कोणाला भेटायचे असल्यास घराबाहेर जातो किंवा त्या व्यक्तीकडे जाऊन त्याला भेटतो. आता मेटाव्हर्स आल्यानंतर त्याद्वारे तुम्हाला तुमच्या घरी बसून एखाद्या व्याक्तीला आभासी जगाद्वारे समोरासमोर भेटता येणार आहे. मेटाव्हर्सच्या या आभासी जगात तुम्हाला तुमच्या मित्राचा 3D अवतार पाहायला मिळणार आहे. आपण वर्तमान जगामध्ये त्यांच्यासोबत ज्या काही ऍक्टिव्हिटी करतो त्या सर्व ऍक्टिव्हिटी तुम्ही त्यांच्यासोबत मेटाव्हर्सच्या आभासी जगात करू शकता.

एवढेच काय तर तुम्ही मेटाव्हर्सद्वारे घर बसल्या तुमच्या मित्रांसोबत डिस्को बारमध्ये पार्टी देखील करू शकता. तसेच त्यांच्यासोबत एखादा गेम खेळण्याचा आनंद देखील तुम्ही लुटू शकता. चित्रपटगृहात चित्रपट पाहण्याचा आनंद देखील तुम्ही घर बसल्या घेऊ शकता. मात्र हा सगळा आनंद घरबसल्या घेण्यासाठी तुमच्याकडे व्हर्चुअल रिऍलिटी बॉक्स म्हणजेच व्हीआर बॉक्स असणे गरजेचे आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button