breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

महिलांना फायदा मिळवून देणाऱ्या सरकारी योजना कोणत्या? कसा घ्याल लाभ?

Govt Schemes For Women : महिलांसाठी सरकार अनेक बचत योजना राबवते. या योजनांच्या माध्यमातून महिलांच्या बचतीला प्रोत्साहन देण्याचं काम केलं जातं. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी केंद्र सरकार विविध योजना राबवत आहे. या योजनांच्या माध्यमातून महिलांना  पाठबळ देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.  जाणून घेऊयात महिलांबद्दल चालवल्या जाणाऱ्या योजनांसर्भात सविस्तर माहिती.

महिला सन्मान बचत प्रमाणपत्र

महिला सन्मान बचत प्रमाणपत्र ही एक महत्वाची योजना आहे. महिला बचतीला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारने २०२३ च्या अर्थसंकल्पात ही योजना सुरू केली होती. ही एकरकमी ठेव योजना आहे. यामध्ये गुंतवणूक एकाच वेळी केली जाते. त्याचा परिपक्वता कालावधी दोन वर्षांचा आहे. १८ वर्षांपेक्षा जास्त वयाची कोणतीही मुलगी किंवा महिला महिला सन्मान बचत प्रमाणपत्रात गुंतवणूक करू शकते. यामध्ये एकावेळी जास्तीत जास्त २ लाख रुपये गुंतवले जाऊ शकतात. सध्या एमएसएससीवर ७.५ टक्के व्याज दिले जात आहे.

प्रधानमंत्री मातृ वंदना योजना

प्रधानमंत्री मातृ वंदना योजना ही पंतप्रधान मंत्री नरेंद्र मोदी सरकारची महिलांसाठीची महत्वाची योजना आहे. गर्भवती आणि बाळाला स्तनपान करणाऱ्या मातांच्या आरोग्याची काळजी घेणारी ही योजना आहे. प्रधानमंत्री मातृवंदना योजनेचा उद्देश्य महिलांचे आरोग्य सुधारून त्यांच्यातील कुपोषण दूर करणे, त्यांना योग्य उपचार आणि औषधांचा खर्च देणे हा आहे. पीएम मातृ वंदना योजनेत प्रेग्नंट आणि स्तनदा मातांना पाच हजार रूपये रोख दिले जातात. या पाच हजार रूपये तीन हप्त्यात डीबीटीद्वारे महिलांच्या खात्यात वळते केले जाते. प्रेग्नंट महिलांना या योजनेत रजिस्ट्रेशन करताना १००० रुपयांचा पहिला हप्ता दिला जातो. सहाव्या महिन्यात किमान एका तपासणीनंतर २००० रूपयांचा दुसरा हप्ता मिळतो. तिसऱ्यांदा बाळाच्या जन्मानंतर रजिस्ट्रेशन झाल्यावर २००० रूपयांचा शेवटचा हप्ता दिला जातो.

हेही वाचा – ‘भाजपचा राजीनामा द्यावा, आम्ही त्यांना मविआतून निवडून आणू’; नितीन गडकरींना उद्धव ठाकरेंची ऑफर

सुकन्या समृद्धी योजना

केंद्र सरकारने ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ अभियानांतर्गत सुकन्या समृद्धी योजना सुरू केली होती. या योजनेंतर्गत मुलींच्या भवितव्यासाठी गुंतवणूक केली जाते. जेणेकरून पालकांना लग्न, शिक्षण यांसारख्या खर्चाची पूर्तता करण्यात कोणतीही अडचण येऊ नये. सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत, फक्त १० वर्षे किंवा त्यापेक्षा कमी वयाच्या मुलींसाठीच खाते उघडता येते. मुलगी २१ वर्षांची झाल्यावर हे सुकन्या समृद्धी खाते परिपक्व होते. यामध्ये किमान २५० रुपयांची गुंतवणूक करता येईल. तुम्ही एका वर्षात कमाल १.५ लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकता. या योजनेत गुंतवणूक केल्यास आयकर कलम ८०C चा लाभही मिळतो.

पोस्ट ऑफिस किंवा बँकेत सन्मान बचत प्रमाणपत्रातही गुंतवणूक करु शकतात

महिला पोस्ट ऑफिस किंवा बँकांद्वारे सन्मान बचत प्रमाणपत्रातही गुंतवणूक करू शकतात. तुम्ही या योजनेत बँक ऑफ बडोदा, कॅनरा बँक, बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक, युनियन बँक ऑफ इंडिया आणि सेंट्रल बँक ऑफ इंडिया द्वारे देखील गुंतवणूक करू शकता.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button