TOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

आयुक्तांची ‘टॅब’च्या गुणवत्तेशी तडजोड?

पिंपरी चिंचवड | पिंपरी-चिंचवड शहरातील विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी चांगल्या प्रतीचे टॅब देण्याच्या आग्रह धरणाऱ्या महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना अचानक टॅबच्या गुणवत्तेशी तडजोड करावी लागली आहे. चांगल्या प्रतिचे टॅब उपलब्ध होत नसल्याने आयुक्तांनी टॅब खरेदी थांबविली होती.मात्र, भाजपने टॅब खरेदीसाठी आयुक्तांवर दबाव वाढविला आहे. त्यामुळे आयुक्तांनी टॅब कसा असावा याचे स्पेशिफिकेशन बदलले आहे. परिणामी, आता शहरातील विद्यार्थ्यांना जेमतेम स्वरुपाचे किंवा कमी प्रतीचे टॅब उपलब्ध होण्याची शक्यता आहे.

शहरातील विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी टॅब वाटप करण्याची घोषणा सहा महिन्यांपूर्वी महापालिकेने केली. त्यासाठी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत मंजूरीही झाली. त्याच दरम्याना कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला. महापालिका आयुक्तांनी विद्यार्थ्यांना चांगल्या प्रतीचे टॅब वाटप करावे, असा आग्रह धरत चार जीबी रॅम असाणारे तसेच सर्व प्रकारचे फिचर्स असणारे टॅब खरेदी करावे, अशी सूचना केली.

त्यासाठी विशेष स्पेसिफिकेशसन ठरवून घेतले. मात्र, त्यांनी दिलेल्या स्पेसिफिकेशन प्रमाणे एवढ्या मोठ्या प्रमाणात मार्केटमध्ये टॅब उपलब्ध झाले नाही. त्यामुळे आयुक्तांनी टॅबची खरेदी थांबविली. घाईघाईत टॅब खरेदी करून त्याच्या गुणवत्तेशी कोणतीही तडजोड करण्यास आयुक्तांनी नकार दिला.

दरम्यान, सत्ताधारी भाजपला कोणत्याही परस्थितीमध्ये आपल्या कार्यकाळात टॅब वाटप करायचे होते. त्यामुळे काही पदाधिकारी आयुक्तांवर मोठ्या प्रमाणात दबाव टाकत असल्याची चर्चा महापालिकेत रंगली. त्यातच बुधवारी महापौर आणि सत्तारूढ पक्षनेत्यांनी पत्रकार परिषद घेत आयुक्त राजेश पाटील पालकमंत्री अजित पवार यांच्या दबावाखाली काम करत असल्याची टीका केली.

आयुक्तांनी टॅब खरेदी थांबविल्याचा आरोपही सत्ताधारी भाजपने केला. भाजपच्या वाढत्या दबावामुळेच आता आयुक्तांनी टॅबच्या स्पेसिफिकेशनमध्ये बदल करत टॅब खरेदीच्या प्रक्रियेला वेग दिल्याची चर्चा रंगली आहे.

विद्यार्थ्यांना चांगल्या गुणवत्तेचे टॅब मिळायला हवे. टॅब खरेदीसाठी मोठी रक्कम लागणार आहे. त्यामुळे टॅबही चांगल्या प्रतीचे हवे. विद्यार्थ्यांना त्याचा चांगला उपयोग व्हायला हवा. या हेतून चार जीबी रॅम आणि विविध फिचर्स असणारे टॅब खरेदी करा, अशी सूचना दिली होती. मात्र, विशेष स्पेसिफिकेशनचे टॅब उपलब्ध होत नसल्याने स्पेसिफिकेशनमध्ये बदल करण्यात आल्याचे आयुक्त राजेश पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button