breaking-newsताज्या घडामोडी
#CoronaVirus: सोलापुरात एकाच दिवशी सापडले ४८ कोरोनाबाधित; नऊ पोलिसांचा समावेश
करोनाचा फैलाव सोलापुरात झपाट्याने वाढत असून रविवारी एकाच दिवशी उच्चांकी ४८ करोनाबाधित रूग्ण सापडले. यात नऊ पोलिसांचाही समावेश आहे. याशिवाय काही आरोग्य कर्मचाऱ्यांनाही करोनाची बाधा झाली आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील करोनाबाधित रूग्णांची संख्या २६४ वर पोहोचली असून यात १४ मृतांचा समावेश आहे.
रविवारी सायंकाळी सहापर्यंत करोनाशी संबंधित संशयित रूग्णांची वैद्यकीय चाचणी केलेले १३२ अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी ४८ व्यक्तींना करोनाबाधा झाल्याचे दिसून आले. यात २९ पुरूष तर १९ महिला आहेत. आज नव्याने आढळून आलेल्या रूग्णांपैकी सर्वाधिक ८ रूग्ण सिध्देश्वर पेठेतील असून त्याशिवाय शनिवार पेठेत सात रूग्ण तर लष्कर (सदर बझार) येथे चार रूग्ण सापडले. एकूण ३२ ठिकाणी रूग्ण सापडले.