breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

‘मुंबईच्या भाजपच्या कार्यालयात लग्न सोहळा, पण नवरदेव गायब’; काँग्रेस नेत्याचा भाजपला टोला

मुंबई : महाराष्ट्र भाजपच्या मुंबईतील कार्यालयात आज सुधीर मुनगंटीवार यांच्यासह, मंगलप्रभात लोढा, किरीट सोमय्या, अतुल भातखळकर या नेत्यांसह कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. महाविकास आघाडीचं सरकार उलथवून टाकण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावलेल्या देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री पदाऐवजी उपमुख्यमंत्री व्हावं लागलं. देवेंद्र फडणवीस यांनी काल एकनाथ शिंदे यांचं नाव मुख्यमंत्री म्हणून घोषित करताना सरकारमध्ये सहभागी होणार नसल्याचं म्हटलं होतं. केंद्रीय नेतृत्त्वाच्या आदेशानंतर देवेंद्र फडणवीस यांनी काल उपमुख्यमंत्रिपदी म्हणून शपथ घेतली. भाजपच्या मुंबईतील कार्यालयात आज त्यानिमित्तानं जल्लोष करण्यात आला मात्र देवेंद्र फडणवीस त्या ठिकाणी उपस्थित नव्हते. काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी या मुद्यावरुन देवेंद्र फडणवीस आणि भाजपवर उपहासात्मक टीका केली आहे. पृथ्वीराज चव्हाण यांनी ट्विट करुन ‘मुंबईच्या भाजपच्या कार्यालयात लग्न सोहळा, पण नवरदेव गायब’ असं म्हटलंय.

  • पृथ्वीराज चव्हाणांचं ट्विट

काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचं महाविकास आघाडी सरकारच्या स्थापनेत महत्त्वाचं योगदान राहिलं आहे. महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर शिवसेनेतून फुटून एकनाथ शिंदे आणि त्यांचे समर्थक आमदार आणि भाजप यांनी एकत्र येत सत्ता स्थापनेचा दावा केल्यानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री म्हणून शपथ दिली. आज भाजपकडून मुंबईतील कार्यालयात यानिमित्तानं जल्लोष करण्यात आला. या जल्लोषाला देवेंद्र फडणवीसांसह भाजपचे प्रमुख नेते गैरहजर होते. पृथ्वीराज चव्हाण यांनी ‘मुंबईच्या भाजपच्या कार्यालयात लग्न सोहळा, पण नवरदेव गायब’ असं म्हणत भाजप नेत्यांना चिमटा काढला आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या जल्लोषाच्या कार्यक्रमातील गैरहजेरीवरुन चव्हाण यांनी भाजपला प्रश्न विचारले आहेत.

भाजपचे प्रमुख नेते अनुपस्थित

आजच्या भाजपच्या जल्लोषाच्या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष, चंद्रकांत पाटील, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, प्रसाद लाड, गिरीश महाजन, आशिष शेलार, नितेश राणे अनुपस्थित होते. सत्तास्थापनेसाठीच्या वाटाघाटी आणि इतर बैठकांमुळं देवेंद्र फडणवीस यांच्यासह इतर भाजप नेते उपस्थित राहिले नसल्याचं सांगण्यात आलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button