TOP Newsदृष्टीक्षेपदेश-विदेशपिंपरी / चिंचवडमहाराष्ट्र

आम्ही सारे सावरकरचे फलक पिंपरी-चिंचवडमध्ये झळकले

पिंपरी : संपूर्ण भारतामध्ये व महाराष्ट्रात वीर सावरकर या विषयावर चर्चा व वादळ उठले असतानाच पिंपरी-चिंचवडमध्ये सुद्धा “मी सावरकर” या आशयाचे बॅनर विविध ठिकाणी झळकले आहेत. त्याची चर्चा शहरात चालू आहे. भाजपा प्रदेश सचिव अमित गोरखे यांनी हे फलक शहरात लावले आहेत.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याकडून वारंवार स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान केला जात आहे. याचा निषेधार्थ आणि सावरकर यांच्या सन्मानार्थ भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना पक्षाच्या वतीने “आम्ही सारे सावरकर” ही‌ मोहीम सुरू करण्यात आली आहे. त्यानंतर भाजपचे प्रदेश सचिव अमित गोरखे यांनी पिंपरी-चिंचवडमध्ये सुद्धा “मी सावरकर” या आशयाचे बॅनर विविध ठिकाणी लावले आहेत. शहरात झळकणाऱ्या या फलकांची चर्चा होत आहे.

या संदर्भात अमित गोरखे म्हणाले की, “देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आयुष्याची होळी करणारे महान क्रांतीकारक स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विषयी सातत्याने अपमानास्पद वक्तव्य केली जात आहेत. तसे करून करोडो देशभक्त नागरिकांच्या भावना दुखावल्या जात आहेत. त्यामुळे ‌”आम्ही सारे सावरकर” हे अभियान सुरू करण्यात आले आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी देशाला स्वातंत्र्य मिळून दिले. आमच्या या स्वातंत्र्यवीरांचा जाणीवपूर्वक होणारा अवमान यापुढे सहन केला जाणार नाही”.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button