ताज्या घडामोडीमराठवाडामहाराष्ट्रविदर्भ

आम्ही अंगावर केसेस घेण्यास तयार; औरंगाबादमध्ये अमित ठाकरेंचं पोलिसांना थेट आव्हान

औरंगाबाद |मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या औरंगाबाद येथे १ मे रोजी होणाऱ्या जाहीर सभेची राज्यभरात जोरदार चर्चा आहे. या बहुचर्चित सभेला पोलिसांनी काही दिवसांपूर्वी परवानगी दिली. मात्र ही परवानगी देताना पोलिसांनी तब्बल १६ अटीही ठेवल्या आहेत. या सभेच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी औरंगाबाद येथे पोहोचलेले राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरेयांनी अटी-शर्थींवरून थेट पोलीस प्रशासनालाच आव्हान दिलं आहे.

राज ठाकरे यांच्या जाहीर सभेला मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी घालून दिलेली आवाजाची मर्यादा पाळणं शक्य होईल का? असा प्रश्न अमित ठाकरे यांना पत्रकारांकडून विचारण्यात आला होता. यावर बोलताना ते म्हणाले की, १ मे रोजी होणारी सभा भव्य-दिव्य असेल आणि आम्ही अंगावर केसेस घ्यायला तयार आहोत.

 

सभास्थळावरील तयारीचा घेतला आढावा

औरंगाबादमधील ऐतिहासिक मराठवाडा सांस्कृतिक मैदानातून राज ठाकरे कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत. या सभेला राज्यभरातून मोठ्या प्रमाणात मनसे कार्यकर्ते दाखल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सभेच्या नियोजनात कोणतीही काटकसर राहू नये, यासाठी स्वत: अमित ठाकरे हे आढावा घेण्यासाठी सभास्थळी पोहोचले. पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आलेल्या तयारीवर मी खूश आहे, असं यावेळी अमित ठाकरे म्हणाले.

दरम्यान, हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून आक्रमक झालेले राज ठाकरे या सभेतही राज्यातील सत्ताधाऱ्यांचा समाचार घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे या सभेकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे.

औरंगाबादमध्ये होणार ‘राज’गर्जना; सभेसाठी पोलिसांकडून कोणत्या अटी?

राज्यातील कायदा-सुव्यवस्था कायम ठेवण्याच्या दृष्टीने राज ठाकरे यांच्या सभेला परवानगी देताना पोलिसांनी अनेक अटी घातल्या आहेत.

– सभा १ मे रोजी दुपारी ४.३० ते रात्री पावणे दहा वाजेच्या दरम्यान घ्यावी. या वेळेत बदल करू नये.
– सभेत आक्षेपाहार्य घोषणाबाजी, हुल्लडबाजी, असभ्य वर्तन होणार नाही याची काळजी घ्यावी.
– शहरात मोटारसायकल, कार रॅली काढू नये.
– सभास्थानाच्या आसन व्यवस्थेची कमाल मर्यादा १५ हजार इतकी आहे. १५ हजारपेक्षा अधिक लोकांना आमंत्रित करू नये.
– सभेदरम्यान कोणत्याही प्रकारे वंश, जात, भाषा, वर्ण, प्रदेश, जन्मस्थान, धर्म किंवा प्रथा आणि परंपरा यावरून व्यक्ती किंवा समुदायाचा अपमान होईल, असे चिथावणीखोर भाषण किंवा कृती, वक्तव्ये, घोषणाबाजी करू नये.
– सभेसाठी वापरण्यात येणाऱ्या ध्वनिक्षेपकाबाबत सर्वोच्च न्यायलयाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे आवाज असावा.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button