breaking-newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय

वाझे प्रकरण सत्ताधाऱ्यांचं हप्ता वसुली कांड; संजय निरुपमांचा गंभीर आरोप

नवी दिल्ली |

प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराजवळ स्फोटके असलेली गाडी आढळल्याच्या प्रकरणातील तपासात काही गंभीर चुका पोलिसांकडून झाल्याने आणि या प्रकरणाची चौकशी निष्पक्ष व्हावी यासाठी परमबीर सिंह यांची पोलीस आयुक्तपदावरून बदली केल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी माध्यमांना सांगितले. तर दुसरीकडे शिवसेना मात्र मुंबईच्या पोलीस आयुक्त पदावरून परमबीर सिंग यांना बदलले म्हणजे ते गुन्हेगार ठरतात असं नाही सांगत त्यांची पाठराखण करत आहे. सचिन वाझे प्रकरणावरुन एकीकडे विरोधक सरकारला कोंडीत पकडत असताना काँग्रेस नेते संजय निरुपम यांनीदेखील घरचा आहेर दिलेला आहे.

विरोधाभास वक्तव्यं सरकारची प्रतिमा खराब करत असून हे सत्ताधाऱ्यांच हप्ता वसुली कांड असल्याचं टीका संजय निरुपम यांनी केली आहे. याचे सर्व धागेदोरे शिवसेनेसोबत जोडलेले आहेत का? अशी विचारणाही त्यांनी केली आहे. “शिवसेना परमबीर सिंह यांचा जयजयकार करत आहे. गृहमंत्री जे राष्ट्रवादीचे आहेत त्यांनी आयुक्तांची चूक नसल्याचं सांगितलं आहे. ही विरोधाभास वक्तव्यं सरकारची प्रतिमा अजून मलीन करत आहेत. वाझे प्रकरणातील तपासावरुन आतापर्यंत हे सत्ताधाऱ्यांचं हप्ता वसुली कांड असल्याचं लक्षात येत आहे. याचे धागेदोरे शिवसेनेशी जोडले आहेत का?,” असं ट्विट संजय निरुपम यांनी केलं आहे.

 

वाचा- धक्कादायक! बल्लारपूर येथील पॅराकमांडो निखिल बुरांडेची आग्रा येथे आत्महत्या

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button