ताज्या घडामोडीमुंबई

विधानपरिषदेच्या तोंडावर वॉरंट, रवी राणा म्हणाले- मुख्यमंत्र्यांच्या दबावाला बळी पडणार नाही

मुंबई|अमरावतीचे आमदार रवी राणांविरोधात जामीनपात्र वॉरंट घेऊन आज अमरावती पोलीस त्यांच्या मुंबईतील घरी पोहोचले. मात्र, रवी राणा हे घरी नसल्याने त्यांना पोलीस अटक करु शकले नाहीत. भाजपला मतदान करु नये या उद्देशाने हा महाविकास आघाडीचा दबाव आहे, याला मी कायदेशीर उत्तर देणार आहे, असं उत्तर यावर रवी राणा यांनी दिलं आहे.

विधानपरिषदेची निवडणूक येत्या २० जून रोजी होणार आहे. त्यामध्ये रवी राणा यांचा भाजपला पाठिंबा असणार आहे. निवडणुकीच्या दोन दिवसांपूर्वी अमरावती पोलीस राणांच्या घरी वॉरंट घेऊन पोहोचले. त्यावर प्रतिक्रिया देताना रवी राणा म्हणाले, की मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीच्या दबावाला बळी पडणार नाही. रवी राणांनी फेसबुकवर याबाबतची प्रतिक्रिया दिली.

“अमरावतीच्या पोलीस आयुक्तांनी छत्रपती शिवाजी महाराज पुतळा प्रकरणात अमरावती येथून पोलीस माझ्या मुंबईतील खार येथील घरी अमरावती पोलीस पाठवले. मुंबई पोलीसही आले. मला अटक करण्यासाठी वॉरंट घेऊन आले होते. त्याठिकाणी मी नसल्याने मला ते अटक करु शकले नाही, भाजपला मी मतदान करु नये या उद्देशाने महाविकास आघाडीचा दबाव, मुख्यमंत्र्यांचा दबाव याला मी कायदेशीर उत्तर देणार आहे. भाजपचे उमेदवार निवडून येतील यासाठी पूर्ण ताकद लावेन. या दबावाला मी बळी पडणार नाही”, असं रवी राणा म्हणाले.

फेब्रुवारी २०२२ मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा हटवण्यात आल्याने संतप्त झालेल्या रवी राणा समर्थकांनी महापालिका आयुक्त प्रवीण आष्टीकर यांच्या अंगावर शाईफेकून निषेध नोंदवला होता. अमरावती पोलिसांनी त्याच्याविरुद्ध कलम ३०७ (हत्येचा प्रयत्न) आणि ३५३ (लोकसेवकाला त्याच्या कर्तव्यापासून परावृत्त करण्यासाठी प्राणघातक हल्ला किंवा फौजदारी बळाचा वापर) अंतर्गत गुन्हे दाखल केले होते. मात्र घटनेच्या वेळी आपण दिल्लीतच असल्याचे राणांनी सांगितले.

रवी राणांनी हनुमान चालीसेचा अपमान केल्याचा काँग्रेसचा आरोप, असं नेमकं काय केलं राणांनी ?

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button