breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

“जिथं जिथं शिवाजी महाराज नव्हते, तिथं मंदिराच्या बाजूला मशीद तयार झाली”

मुंबई |

राज्यात आज अनेक ठिकाणी तिथीनुसार शिवजयंती साजरी केली जात आहे. एकीकडे मनसे मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी करत असताना दुसरीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबई विमातनळाबाहेरील पुतळ्याला अभिवादन केलं. विधानसभेतही हा मुद्दा उपस्थित झाला असून मुख्यमंत्र्यांनीच तिथीप्रमाणे शिवजयंती साजरी केली असताना सरकार अधिकृतपणे जाहीर का करत नाही? अशी विचारणा भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केली. यादरम्यान भाजपा नेते अनिल बोंडे यांनी एका कार्यक्रमात केलेल्या वक्तव्याची सध्या चर्चा सुरु आहे. बार्शी येथे आयोजित एका कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले की, “एक गोष्ट लक्षात ठेवा अमरावतीला आम्ही होतो, त्यावेळी आम्ही समर्थपणे ताकद दाखवली. तेव्हा तरुण होतो. छत्रपती शिवाजी महाराज की जय आपण म्हणतो. कोणी कमी आवाजात म्हणतो, कोणी मोठ्या आवाजात म्हणतो. पण छत्रपती शिवाजी महाराज होते म्हणून पंढरपूरचा विठोबा वाचला, तुळजापूरची भवानी वाचली, कोल्हापूरची महालक्ष्मी वाचली”.

“जिथं शिवाजी महाराज नव्हते, तिथं मंदिराच्या बाजूला मशीद तयार झाली. अयोध्येचं राम मंदिर, मथुरा किंवा काशी विश्वनाथ असो तिथे शेजारी मशीद तयार झाली”, असं सांगताना त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणताना आपले पोरं पोरी मजबूत राहिले पाहिजे, याचंही भान ठेवलं पाहिजे, असं ते म्हणाले.

  • “…तर ३० वर्षानंतर तुमच्या मुलींनाही हिजाब घालावा लागेल”

“परिस्थिती अशी आहे की तुम्ही आम्ही फक्त भारतमाचे पुत्र आहोत म्हणाल आणि नुसतं हातावर हात देऊन उभे राहिलात तर ३० वर्षानंतर तुमच्या मुलींनाही इतर देशांमध्ये ज्याप्रमाणे हिजाब, बुरखा घालणं अनिवार्य आहे त्याप्रमाणे घालावा लागला तर त्यात नवल वाटणार नाही,” असा इशाराच अनिल बोंडे यांनी दिला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button