breaking-newsपुणे

#Waraginestcorono:पुण्यात अँटिबॉडी टेस्ट किटची निर्मिती, भारताला मोठं यश

पुणे : कोरोनाविरोधात लढताना भारताला एक मोठं यश आलं आहे . भारतीय संशोधकांकडून अँटिबॉडी टेस्ट किटची निर्मिती करण्यात आली आहे. विशेष म्हणजे पुण्यातल्या संशोधकांकडून या अँटीबॉडी टेस्ट किटची निर्मिती करण्यात आली आहे. एलिसा अँटीबॉडी टेस्ट किट असं या किटचं नाव आहे.

पुण्यातील नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ व्हायरोलॉजीने या किटची निर्मिती केली आहे. एलिसा अँटीबॉडी टेस्ट किटमुळे किती लोकसंख्येला किंवा समुहाला कोरोनाची लागण होऊ शकते, याचा अंदाज येईल. कारण कोरोना व्हायरसमुळे बाधित व्यक्तीच्या शरीरात व्हायरसशी लढण्यासाठी अँटीबॉडीज तयार होतात.

मुंबईत 2 वेगवेगळ्या ठिकाणी याची टेस्टिंग करण्यात आली. त्यावेळी ही किट योग्य असल्याचं निदर्शनास आलं. अडीच तासांत या किट्सच्या माध्यमातून 90 सॅम्पल टेस्ट करण्यात आल्या. आता या किट्सच्या कमर्शिअल प्रोडक्शनसाठी जायडस कॅडिला कंपनीला परवानगी देण्यात आली आहे.

एलिसा अँटीबॉडी टेस्ट किटमुळे शरिरातील अँटिबॉडीजची माहिती मिळते. तर कोरोनाच्या निदानासाठी RT PCR किटचा वापर करावा लागतो. अँटीबॉडी टेस्ट किट आणि RT PCR किटमध्ये फरक आहे.

अँटीबॉडी टेस्ट किट आणि RT PCR किटमध्ये फरक काय?

  •  कोरोना व्हायरसमुळे बाधित व्यक्तीच्या शरीरात अँटीबॉडीज तयार होतात. त्याचा शोध अँटिबॉडी टेस्टद्वारे घेण्यात येते. रिझल्ट लवकर येतो. तर कोरोना तपासणीसाठी RT PCRचा अहवाल येण्यासाठी जवळपास 24 तास लागतात.
  • अँटीबॉडी टेस्ट किटद्वारे निदान करण्यासाठी रक्ताचे 2 थेंब घेतले जातात. तर RT PCR टेस्ट करण्यासाठी रुग्णाचा स्वॅब घेतला जातो.

अँटिबॉडी टेस्ट किट तयार करुन भारतानं पहिलं यशाचं पाऊल टाकलं आहे. येत्या काळात लसही शोधण्यात यश येईल, अशी आशा देशातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button