breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

बेळगावच्या जिल्हा रुग्णालयात संतप्त जमावाने रुग्णवाहिका पेटवली

बेळगाव | जिल्हा रुग्णालयातील कोरोना विभागात रुग्णाच्या उपचारादरम्यान मृत्यू झाल्यानंतर संतप्त जमावाने रुग्णवाहिका पेटवून दिली. त्यानंतर रुग्णालयाबाहेर उभ्या असलेल्या खासगी वाहनांवरही दुकान दगडफेक करण्यात आल्याची घटना बुधवारी रात्री घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस आयुक्त के. त्यागराजन तसेच जिल्हाधिकारी हिरेमठ यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली.

जिल्हा रुग्णालयात कोरोना बाधितांची संख्या वाढली आहे. रुग्णांच्या वाढलेल्या संख्येमुळे बेडची कमतरता भासत आहे. यातूनच रुग्णांवर उपचार करण्यास काहीसा अडथळा निर्माण होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.या पार्श्वभूमीवर जिल्हा रुग्णालयात डॉक्टर कर्मचाऱ्यांसोबत नागरिकांचे वारंवार वाद होत आहेत. शहरातील एका रुग्णावर कोरोना विभागात उपचार सुरू होते. सदर रुग्णाचा काल बुधवारी रात्री उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृत्यू झाल्याची माहिती मिळाल्यानंतर संतप्त जमावाने जिल्हा रुग्णालय समोर थांबलेल्या रुग्णवाहिकेला पेटवून दिले. त्यानंतर जमावाने रुग्णालयाबाहेर खाजगी वाहनांवरही दगडफेक केली. यामध्ये पोलिस आणि आरोग्य खात्याच्या वाहनांवरही दगडफेक झाली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button