breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

#Waragainstcorona: ‘रिअल हिरो’च्या पगाराला ‘कात्री’ नको; उलट प्रोत्साहन भत्ताही द्या : आमदार महेश लांडगे

– राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे विनंतीबाबत निवेदन

– …अन्यथा महासभेत प्रस्ताव;  ‘त्या’कर्मचाऱ्यांना पगारासह ‘इन्सेंटिव्ह’

पिंपरी । महाईन्यूज । प्रतिनिधी

कोरोना विषाणुच्या प्रादुर्भावामुळे जगभरात हाहाकार माजला आहे. अत्यावश्यक सुविधा देणाऱ्या ‘रिअल हिरों’च्या जोरावरच कोरोनाविरुद्धची लढाई आपण यशस्वी करण्याचा प्रयत्न करीत आहोत. त्यामुळे आरोग्य सुविधांशी संबंधित कर्मचारी, डॉक्टर, पोलीस प्रशासनातील सर्व कर्मचारी यांच्या पगारामध्ये राज्य सरकार अथवा स्थानिक स्वराज्य संस्थांनी कपात न करता उलट प्रोत्साहन भत्ता (इन्सेंटिव्‍ह) द्यावा, अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी केली आहे.

          राज्य सरकार तसेच महापालिका प्रशासनांतर्गत विविध अस्थापनांवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये किमान २५ टक्के कपात करण्यात येईल, अशी चर्चा आहे. तसेच, दोन टप्प्यांत पगार करण्यात येईल, असा राज्य सरकारने निर्णय घेतला आहे. मात्र, अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये कपात किंवा दोन टप्पे असा विचार न करता उलट त्यांना पूर्ण पगार आणि प्रतिकूल परिस्थित कर्तव्य बजावल्याबाबत प्रोत्साहन भत्ता (इन्सेंटिव्ह) देण्याची गरज आहे, अशी भूमिका आमदार लांडगे यांनी मांडली.

          याबाबत बोलताना आमदार लांडगे म्हणाले की,  कोरोनाच्या संकटाविरुद्ध राज्याचा सार्वजनिक आरोग्य विभाग, वैद्यकीय शिक्षण विभाग, पोलीस विभागासह अत्यावश्यक सेवेत समावेश असलेले सर्व कर्मचारी युद्धपातळीवर काम करत असून त्यांच्या वेतनात कपात करणे म्हणजे त्यांचे आणि त्यांच्या कुटुंबाचे मानसिक खच्चीकरण केल्यासारखे होईल. राज्यातील आर्थिक घडी विस्कळीत झाली असली, तरीसुद्धा ज्यांच्या जीवावर आपण या कोरोनारुपी संकटाला तोंड देत आहोत. त्या कर्मचाऱ्यांना अर्थात आपल्या ‘रिअल हिरों’ना प्रशासन म्हणून आपण प्रोत्साहन दिले पाहिजे. त्यांचा पगार खरंतर वाढवला पाहिजे. याबाबत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विनंतीपर निवेदन देण्यात येणार आहे.

…तर महापालिका सर्वसाधारण सभेत प्रस्ताव करणार!

महापालिका आयुक्त श्रावण हर्डिकर यांनी आपल्या अधिकाराचा वापर करुन महापालिका अस्थापनेवरील अत्यावश्यक सेवेत येणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना पूर्ण पगार द्यावा. तसेच, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउनच्या काळात जीवावर बेतणारी परिस्थिती असताना कर्तव्य बजावल्याबाबत संबंधित सर्व कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन भत्ता (इन्सेंटिव्ह) देण्याबाबत सकारात्मक भूमिका घ्यावी. आयुक्तांना प्रशासकीय नियमावलीत अडथळे निर्माण होत असतील, तर सत्ताधारी भाजपाच्या पुढाकाराने आणि सर्वपक्षीय नगसेवकांच्या उपस्थितीत महापालिका सर्वसाधारण सभा आणि स्थायी समिती सभेत अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना वाढीव पगार आणि प्रोत्साहन भत्ता देण्याबाबत रितसर ठराव पास करण्यात येईल. मात्र, ‘आपल्या कुटुंबाचा आपल्या जीवचा विचार न करता समाजासाठी कर्तव्य बजावले त्या ‘रिअल हिरों’चे मानसिक खच्चीकरण होवू देणार नाही, अशी आग्रही भूमिका आमदार लांडगे यांनी घेतली आहे.

महापालिका प्रशासनाची कामगिरी कौतुकास्पद…

महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण संख्येत पिंपरी-चिंचवड शहराचा तिसरा क्रमांक लागतो. सध्या शहरात ६२ रुग्ण आहेत. सरकारने शहराचा समावेश ‘रेड झोन’मध्ये केला आहे. महापालिका आयुक्त श्रावण हर्डिकर यांनी पिंपरी-चिंचवड महापालिका हद्द कॅन्टोंन्मेंट म्हणून घोषित केला. आरोग्य विभाग, वैद्यकीय विभाग आणि पोलीस प्रशासनातील कर्मचारी शहराला कोरोनापासून वाचवण्यासाठी जीव धोक्यात घालून प्रयत्न करीत आहेत. आयुक्त श्रावण हर्डिकर, पोलीस आयुक्त संदीप बिश्नोई आणि त्यांची टीम अत्यंत हिंमतीने ही लढाई जिंकण्यासाठी धडपड करीत आहे. नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य केले पाहिजे. प्रशासनाची कामगिरी कौतुकास्पद आहे. आपण शहराला कोरोनामुक्त करणार आहोत, असा विश्वासही आमदार लांडगे यांनी यावेळी व्यक्त केला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button