breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पद्मश्री गिरीश प्रभुणे यांचा मनसेकडून ‘मराठी शिलेदार’ पुरस्काराने सन्मान

पिंपरी / महाईन्यूज

भटक्या विमुक्त समाजासाठी संपूर्ण आयुष्य झोकून देऊन कार्य करीत असलेले चिंचवड येथील गिरीश प्रभुणे यांना केंद्राकडून पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे ‘मराठी शिलेदार‘ पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.

चिंचवड येथील पुनरूत्थान समरसता गुरूकुलम येथे हा कार्यक्रम झाला. मनसेचे राज्य उपाध्यक्ष गणेश सातपुते यांच्या हस्ते प्रभुणे यांना गौरविण्यात आले. या प्रसंगी नगरसेवक सचिन चिखले, अश्विनी बांगर, राजू भालेराव, शैलेश पाटील, रूपेश पटेकर, सुशांत साळवी, दत्ता देवतरासे, विशाल मानकरी, सीमा बेलापूरकर आदी उपस्थित होते.

सचिन चिखले त्यांचा गौरव करताना म्हणाले, पारधी जमातीसहित भटक्या विमुक्त समाजाला आत्मभान मिळवून देण्यात प्रभुणे यांचा मोठा वाटा आहे. चिचवड येथील क्रांतीवीर चापेकर स्मारकासाठी घेतलेल्या कष्टातून त्यांच्यातील धडाडीच्या वृत्तीचे दर्शन घडते. भटके विमुक्त विकास परिषदेच्या वतीने बीड, उस्मानाबाद, सोलापूर, लातूर, पुणे, परभणी, नांदेड या भागांतील पारधी समाजाला संघटित करून त्यांना जागृत केले. त्यांच्यावरील अन्यायाला, अत्याचारांना वाचा फोडली. चिंचवड येथे पुनरुत्थान समरसता गुरुकुलमची स्थापना केली. या संस्थेत वंचित समाज घटकातील मुलांच्या बारावीपर्यंतच्या शिक्षणाची सोय केलेली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button