breaking-newsTOP Newsटेक -तंत्रताज्या घडामोडीपुणेमुंबईराजकारणराष्ट्रिय

‘तो’ हल्ला महाराष्ट्राच्या स्वाभिमानावरचा हल्ला; अजितदादांकडून निषेध

मुंबई । महाईन्यूज । विशेष प्रतिनिधी ।

कर्नाकट आणि महाराष्ट्र यांच्यातील सीमावाद दिसेंदिवस चिघळताना दिसतोय. दोन्ही बाजूंनी आता वाहनांना लक्ष्य केले जात आहे. कर्नाटकात महाराष्ट्राच्या वाहनांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ पुण्यातील शिवसैनिकांनी मंगळवारी (6 डिसेंबर) कर्नाटकच्या सरकारी बसेसला काळे फासले. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी याप्रकरणी केंद्र सरकारने हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. या घटनेनंतर आता महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांना फोन करत तीव्र नाराजी व्यक्त केली.मराठी भाषिक बेळगाव भागात महाराष्ट्राच्या गाड्यांवर कन्नड गुंडांनी केलेल्या भ्याड हल्ल्याचा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी तीव्र शब्दात निषेध केला आहे.

महाराष्ट्राच्या गाड्यांवरचा हल्ला महाराष्ट्राच्या स्वाभिमानावरचा हल्ला आहे. अशा भ्याड हल्ल्यातून सीमाभागातील मराठी भाषिकांच्या मनात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न कधीही यशस्वी होणार नाहीत. असे भ्याड हल्ले महाराष्ट्र सरकारने खपवून घेऊ नयेत. महाराष्ट्र सरकार आणि सत्तारूढ पक्षांनी नेभळटपणा, बोटचेपी भूमिका सोडावी. निव्वळ निषेध करून चालणार नाही. ‘अरे’ ला ‘कारे’ म्हणण्याची हिम्मत महाराष्ट्र सरकारने दाखवावी असे आवाहनही अजित पवार यांनी सरकारला केले.

कर्नाटक सरकारच्या पाठींब्यामुळेच हे प्रकार घडत आहेत. महाराष्ट्र सरकारने यासंदर्भात कणखर भूमिका घ्यावी. केंद्रसरकारने कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना समज द्यावी. मराठी माणसांच्या रक्षणासाठी, अस्मितेसाठी विरोधी पक्ष आणि महाराष्ट्र अभिमानी नागरिक एकजूटीने सीमाभागातील मराठी भाषिकांच्यामागे ठामपणे उभे आहेत. सत्तारुढ पक्षांनीही आपले कर्तव्य पार पाडावे. कोणत्याही परिस्थितीत सीमाभागात अनुचित प्रकार आणि भ्याड हल्ले खपवून घेवू नयेत. महाराष्ट्राची एकजूट दाखवण्याची हीच वेळ आहे. अशा शब्दात अजित पवार यांनी सरकारला खडसावले आहे.

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्याशी या प्रकरणी चर्चा केली. यावर उपमुख्यमंत्री कार्यालयाने सांगितले की, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांशी बोलून बेळगावजवळील हिरेबागवाडी येथील घटनांबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. यानंतर कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी दोषींवर कठोर कारवाई केली जाईल. महाराष्ट्रातून येणाऱ्या वाहनांचे संरक्षण केले जाईल, असे आश्वासन फडणवीस यांना दिले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button