#Waragainstcorona: पुण्यातील ससून रुग्णालयात आणखी तीन कोरोना रुग्णांचा मृत्यू; बळींची संख्या 55 वर!
पुणे । महाईन्यूज । प्रतिनिधी
पुण्यातील ससून रुग्णालयात आणखी तीन कोरोनबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. तर 3 नव्या रुग्णांनाचा वैद्यकीय अहवाल कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निदान झाले आहे. त्यामुळे ससूनमधील कोरोना मृत्यूंचा आकडा आता 46 इतका झाला आहे,तर शहरात आजपर्यंत एकूण 55 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
पुण्यात मृतांमध्ये हडपसर आणि पार्वती दर्शन येथील दोन पुरुष आणि भवानी पेठेतील एका महिलेचा समावेश आहे. मृत पुरुषांचे वय अनुक्रमे 53 आणि 65 होते, ते महिलेचे वय 56 वर्ष होते. बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय व ससून रुग्णालयाचे अधिष्ठात्यांकडून मिलेल्या माहितीनुसार आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत ससून रुग्णालयात 137 रुग्णाची कोरोना चाचणी करण्यात आली त्यापैकी तीन रुग्णाचे अहवाल पॉझिटिव्ह आले. तर तीन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. यामुळे ससूनमधील कोरोनाबाळींची संख्या 46 वर पोहोचली आहे, अशी माहिती प्रशासनाकडून मिळाली.