breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

#waragainstcorona: परभणी जिल्हा कोरोनामुक्त झाला असून तो पुढेही कोरोनामुक्तच राहील : पालकमंत्री नवाब मलिक

परभणी। महाईन्यूज । प्रतिनिधी

परभणी जिल्ह्यातील एकमेव कोरोना बाधित रुग्णाचा तिसरा अहवालही निगेटिव्ह आल्याने परभणी जिल्हा अखेर कोरोनामुक्त झाला आहे. यासाठी मेहनत घेणाऱ्या सर्व यंत्रणांचे अल्पसंख्याक मंत्री आणि परभणी जिल्हयाचे पालकमंत्री नवाब मलिक यांनी आभार मानले तसेच यंत्रणेने घेतलेल्या मेहनतीचे कौतुक केले आहे.

पुण्यातून आलेल्या कुटुंबातील एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यामुळे संपूर्ण यंत्रणा कामाला लागली होती. त्या रुग्णाच्या कुटुंबाला क्वारंटाईन करण्यात आले होते. त्यानंतर संपूर्ण प्रशासकीय यंत्रणेने जिल्हयात खबरदारी घेतली होती. दरम्यान या कामी मेहनत घेणाऱ्या यंत्रणेचे विशेषतः जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, डॉक्टर्स, नर्सेस व आरोग्य कर्मचारी या सर्वांच्या कामाचे पालकमंत्री नवाब मलिक यांनी कौतुक केले आहे आणि यापुढेही परभणी जिल्हा कोरोनामुक्तच राहील असा विश्वासही व्यक्त केला आहे. अधिक दिवे

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button