TOP Newsताज्या घडामोडीदृष्टीक्षेपपुणेमहाराष्ट्रराजकारण

आंबेगावमध्ये राष्ट्रवादीचा देव‘कोपला’!

देवदत्त निकम यांची बंडखोरी : २०२४ च्या विधानसभेची तयारी?

पुणे : माजी गृहमंत्री आणि आंबेगाव तालुक्याचे आमदार दिलीप वळसे पाटील यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळख असलेले देवदत्त निकम यांनी मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीत बंडखोरी केली आहे. त्यांनी वळसे पाटील यांचा आदेश झुगारून बाजार समितीत वेगळं पॅनल उभं केले आहे. त्यामुळे आंबेगाव तालुक्यातील राष्ट्रवादीमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे.

विशेष म्हणजे, देवदत्त निकम २०२४ मध्ये आंबेगाव विधानसभा निवडणूक लढवणार असून, घराणेशाहीला बगल देत वळसे-पाटलांचा उत्तराधिकारी म्हणून लोकांसमोर जातील, अशीच रणनिती दिसत आहे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

दरम्यान, पक्षविरोधी कारवाई केल्यामुळे निकम यांना पक्षातून हकलापट्टी करण्याच्या हालचाली देखील सुरू झाल्याची माहिती समोर आहेत आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक ज्या दिवशी जाहीर झाली. त्यावेळीच पक्षाकडून निकम यांना उमेदवारी नाकारण्यात आली होती. मात्र, निकम यांनी आपली भूमिका मांडत आपण अपक्ष निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले. पक्षाच्या सर्व मी कारभारात सहभागी होतो. मात्र, मलाच उमेदवारी का नाकरण्यात आली असा सवाल करत निकम यांनी मनातील खंत बोलून दाखवली होती.

राष्ट्रवादीला फटका बसणार…
देवदत्त निकम हे वळसे पाटील यांचे निकटवर्तीय मानले जातात. १९९० पासून देवदत्त निकम हे वळसे पाटील यांच्यासोबत काम करत आहेत. आतापर्यंत त्यांनी निष्ठेने काम केले आहे. देवदत निकम यांनी बंडखोरी करण्यामागच्या चर्चांना आता उधाण आले आहे. देवदत्त निकम हे आमदारकीसाठी इच्छुक असून त्यांनी ही बंडखोरी करत असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. त्यामुळे देवदत्त निकम यांच्या बंडखोरीचा राष्ट्रवादीला आणि वळसे पाटील यांना फटका बसणार का? हे पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे.

वळसेंना बंडखोरीचे ग्रहण कायमच…!

सन २००४ मध्ये वळसेंचे जिवलग मित्र शिवाजीराव आढळराव यांना लोकसभेत जावू न देण्याचे राजकारण वळसेंचे अंगलट आले आणि आढळराव यांची बंडखोरी झाली. सन २०१४ मध्ये निकमांइतकेचे गळ्यातले ताईत राहिलेले पुणे जिल्हा परिषदेचे माजे उपाध्यक्ष अरुण गिरे यांची बंडखोरी झाली. मधल्या काळात कात्रज संघाचे माजी उपाध्यक्ष व राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष हिंगे हेही गिरे यांचेसोबत जाण्याची कुणकुण राहिली. आता तर थेट निकम यांचेकडूनच बंडखोरी झाल्याने वळसेंसाठी ही बंडखोरी सोपी राहणार नाही. कारण त्यांचे उत्तराधिकारी म्हणून ठामपणे एकाचेही नाव पुढे दिसत नसल्याने सन २००४ पासून वळसे-पाटील यांना लागलेले बंडखोरीचे ग्रहण सन २०२४ मध्ये आंबेगाव-शिरुरमध्ये काय चमत्कार करणार त्याचीच लिटमस चाचणी म्हणजे आंबेगाव बाजार समितीची २८ तारखेची निवडणूक म्हणावी लागेल.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button