Uncategorizedताज्या घडामोडीमराठवाडामहाराष्ट्र

धुळे महानगरपालिकेचे प्रदीप कर्पे यांचा महापौर पदाचा राजीनामा

धुळे | धुळे महानगरपालिकेचे महापौर प्रदीप कर्पे यांनी काल संध्याकाळी उशिरा आपल्या महापौर पदाचा राजीनामा दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाचा आदर राखत उर्वरित कालावधीत आपण राजीनामा देत असल्याचे प्रदीप कर्पे यांनी आपल्या राजीनामा पत्रात म्हटले आहे. धुळे महानगरपालिका आयुक्त व नगर सचिवांकडे हा राजीनामा त्यांनी सुपूर्द केला आहे.

ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल असून आज या याचिकेवर अंतिम निकाल येण्याची शक्यता आहे. धुळ्यातील महापौर पदाच्या निवडणुकीत ट्रिपल टेस्टचे पालन केले नाही म्हणून न्यायालयात याचिका दाखल आहे. यावरून न्यायालयाचा आदर करत महापौर प्रदीप कर्पे यांनी आपला राजीनामा सुपूर्द केला आहे.

पंतप्रधानाचं घर जाळलं, खासदाराची हत्या; घराणेशाहीला वैतागलेली जनता रस्त्यावर

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button