breaking-newsपिंपरी / चिंचवड

#War Against Corona : पिंपरी-चिंचवड तहसिल कार्यालयामार्फत गरजूंना फूड पॅकेट वाटपासाठी संकेतस्थळ

पिंपरी । महाईन्यूज । प्रतिनिधी

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे गोरगरिबांचे अन्नावाचून हाल होऊ नयेत यासाठी पिंपरी चिंचवड अप्पर तहसील कार्यालयाने नवीन संकेतस्थळ सुरु केले आहे. या संकेतस्थळाच्या माध्यमातून शहरातील गरजू नागरिकांना त्यांच्या घरजवळ जीवनावश्यक साहित्य मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्याचा गरजू नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन तहसिलदार गीता गायकवाड यांनी केले आहे.

पिंपरी चिंचवड अप्पर तहसील कार्यालयाने आपल्या कार्यक्षेत्रातील एकूण ३० गावांमधील गरजू, गोरगरीब, निराधार, दिव्यांग, जेष्ठ नागरिक व परराज्यातील मजूर यांच्यासाठी फूड पॅकेटची व्यवस्था केली आहे. त्याच्या वाटपासाठी ऑनलाईन संकेतस्थळ सुरु करून त्याची अधिकृत लिंक उपलब्ध करुन दिली आहे. या लिंकच्या माध्यमातून गरजू लोकांना त्यांच्या परिसरातील स्वयंसेवी संस्था व पिंपरी-चिंचवड महापालिकेची सर्व क्षेत्रीय कार्यालयांच्या माध्यमातून तयार अन्न पदार्थ वाटप करण्याची केंद्र गुगल मॅपसह निश्चित करण्यात आली आहे. या कामासाठी शहरातील एकूण ११ स्वयंसेवी संस्थांची मदत घेण्यात आली आहे.

कोरोनाच्या आपत्ती काळामध्ये या लिंकच्या माध्यमातून नागरिकांना मोबाईल अॅपद्वारे फूड पॅकेट सेवा उपलब्ध करुन देण्याचा पुणे जिल्ह्यातील पहिला मान पिंपरी-चिंचवड अप्पर तहसील कार्यालयाला मिळाला आहे. या सेवेचा सर्व गरजू नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन तहसीलदार गिता गायकवाड यांनी केले आहे.

https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLScNC44xfzZ2x8sclwCcqe99IFilxHqAT6_hmFE5JnWGeDMxKQ/viewform पिंपरी-चिंचवडमधील गरजू नागरिकांनी फूड पॅकेट मिळविण्यासाठी या नवीन संकेतस्थळाचा वापर करावा. कोरोनाचा प्रतिबंध करण्यासाठी प्रत्येकाने घरी राहावे व सुरक्षित राहावे, असे आवाहन तहसिलदार गिता गायकवाड यांनी केले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button