breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

#War Against Corona: पोलिस कर्मचाऱ्यांचे पगार थकवू नका…हात जोडून विनंती : मनसेचे नेते बाळा नांदगावकर (व्हीडिओ)

मुंबई। महाईन्यूज । प्रतिनिधी

राज्य सरकारने पोलीस आणि संबंधित कर्मचाऱ्यांचे पगार थकवू नयेत. कर्मचारी तणावात आहेत, त्यामुळे पगार पूर्ण मिळवून देण्याबाबत समाधानकारक तोडगा काढावा, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली आहे.

मनसेचे नेते बाळा नांदगावकर म्हणाले की, कोरोनाच्या अवघड परिस्थितीत मुख्यमंत्री आणि तुमची टीम खूप मेहनत करत आहात, परंतु पोलीस बांधव व ईतर काही सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार हे काही कारणांमुळे थकले आहेत, परंतु काहीही करून हे पगार देणे गरजेचे आहे. कारण ह्याच सर्व सरकारी कर्मचाऱ्यांमुळे आपण एवढ्या मोठ्या संकटाचा सामना करू शकत आहोत. त्यामुळे तुम्ही अतिशय तातडीने ह्याबद्दल समाधानकारक तोडगा काढावा.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button