Uncategorized

#War Against Corona: पोलिसांच्या सौरक्षणासाठी मास्क व हॅन्ड सॅनिटायझर याचे वितरण

पिंपरी । महाईन्यूज । प्रतिनिधी

पोलीस मित्र संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या पुढाकाराने व मुकूल माधव फौंडेशन यांच्या सहयोगाने पुणे व पिंपरी चिंचवड पोलीस दलातील पोलिसांच्या सौरक्षणासाठी मास्क व हॅन्ड सॅनिटायझर याचे वितरण

कोरोना साथीचा देशभर प्रसार होत असताना त्यापासुन पोलिसांचे सौरक्षण व्हावे यासाठी पोलीस मित्र संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र कपोते यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हा सचिव सुमित दरंदले यांच्या पुढाकाराने मुकूल माधव फौंडेशन यांच्या सहयोगाने पुणे व पिंपरी चिंचवड पोलीस दलातील सर्व पोलिसांना मास्क व हॅन्ड सॅनिटायझर यांचे वाटप  सोशल डिस्टंस चे भान ठेवून

सहा.पोलीस आयुक्त नीलीमा जाधव व वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक प्रसाद गोकूळे यांच्या उपस्तित पिंपरी चिंचवड पोलीस दलातील पोलिसांसाठी   मास्क व हॅन्ड सॅनिटायझर यांचे वाटप करण्यात आले.

खडकी येथे पोलीस निरीक्षक सौ.संगीता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या वस्तूंचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाप्रसंगी संघटनेचे सुमित दरंदले, प्रविण दोडके, संजय गोतावळे, नितीन रणदिवे उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button