breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपुणेमहिला दिनराजकारण

अजित पवारांना शरद पवारांचा मोठा धक्का, हा आमदार सोडणार साथ

पुणे | राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या उभ्या फुटीनंतर आता अजित पवार आणि शरद पवार यांच्यात रस्सीखेच सुरु आहे. अजित पवारांचा विश्वासू सहकारी आमदार निलेश लंके अजित पवार गटाची साथ सोडणार आहेत. निलेश लंके हे अजित पवार यांचे अत्यंत निकटवर्तीय मानले जातात. शरद पवार गटाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी ही माहिती अधिकृतपणे दिली आहे. आमदार लंकेंना अहमदनगरमधून लोकसभेची उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता आहे.

अहमदनगरला निलेश लंके प्रतिष्ठान आयोजित महानाट्याच्या वेळी खासदार अमोल कोल्हे यांनी लंके यांना महाविकास आघाडीत येऊन तुतारी घेऊन निवडणूक लढण्याच निमंत्रण दिल होतं. महाराष्ट्राच्या स्वाभिमानीसाठी दिल्लीच्या तक्त्याला घाम फोडणारा असा लोकनेता आता आमच्या खांद्याला खांदा लावून संसदेत यावं, असे कोल्हे यांनी म्हटलं होतं. तर लोकनेत्यांनी लवकरात लवकर निर्णय घ्यावा महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची तुतारी नगर दक्षिणमध्ये वाजवलीच पाहिजे, असे त्यांनी म्हटले होते. कोल्हेंच्या त्या आवाहनाला आता निलेश लंके यांनी प्रतिसाद दिला आहे.

हेही वाचा    –      ‘फडणवीस तुम्ही चुकीच्या माणसाला खेटताय’; मनोज जरांगेंचा इशारा

निलेश लंके यांचा पक्षप्रवेश शरद पवार यांच्या उपस्थित सोमवारी होत आहे. गेल्या काही दिवसांपासून ते राष्ट्रवादी शरद पवार गटात दाखल होणार असल्याची चर्चा होत होती. आता अधिकृतपणे ते शरद पवार गटात प्रवेश करणार आहे. त्याचवेळी शरद पवार त्यांची उमेदवारी जाहीर करण्याची शक्यता आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button