breaking-newsTOP Newsक्रिडाताज्या घडामोडी

विराटचं शतक! शमीची तुफान खेळी, भारतीय संघ अंतिम फेरीत दाखल!

World Cup 2023 : विश्वचषक २०२३ च्या सेमी फायनलमध्ये भारत-न्यूझीलंड एकमेकांशी भिडले. हा सामना मुंबईतल्या वानखेडे मैदानावर खेळला गेला. या सामन्यात भारताने न्यूझीलंडचा ७० धावांनी पराभव केला. यासह भारतीय संघाने फायनलमध्ये धडक मारली आहे.

भारतीय संघाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताने न्यूझीलंडला विजयासाठी ३९८ धावांचं आव्हान दिलं. विराट कोहली, श्रेयस अय्यर यांची शतकी खेळी केली. विराट कोहलीने ११३ चेंडूंमध्ये ११७ धावा केल्या. विराटने ५० वं शतक करत सचिनचा रेकॉर्ड मोडला. वन डे सामन्यात ५० शतकं ठोकणारा विराट हा जगातला पहिला क्रिकेटर ठरला आहे. श्रेयस अय्यर याने १०५ धावांची शतकी खेळी केली.

हेही वाचा – संत साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी आमदार महेश लांडगे!

प्रत्युत्तरात न्यूझीलंडकडून डॅरेल मिचेल याने सर्वाधिक १३४ धावांची खेळी केली. कॅप्टन केन विलियमसन याने ६९ धावांचं योगदान दिलं. ग्लेन फिलिप्स ४१ धावांवर आऊट झाला. सलामी जोडी डेव्हॉन कॉनव्हे आणि रचिन रवींद्र या दोघांनी प्रत्येकी १३ धावा केल्या. तर टीम इंडियाकडून मोहम्मद शमी याने सर्वाधिक विकेट्स घेतल्या. शमीने सर्वाधिक ७ विकेट्स घेतल्या. तर जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि कुलदीप यादव या तिघांनी प्रत्येकी १-१ विकेट घेतली.

दरम्यान टीम इंडिया वर्ल्ड कपमध्ये चौथ्यांदा फायनलमध्ये पोहचली आहे. त्याआधी १९८३, २००३ आणि २०११ साली भारतीय संघ फायनलमध्ये पोहचली होता.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button