breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणेमनोरंजनमहाराष्ट्र

गौतमी पाटीलचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल करणाऱ्याला अखेर पुणे पोलिसांकडून अटक

पुणे : नृत्यांगणा गौतमी पाटील हिचे फोटो आणि व्हिडीओ काही दिवसांपासून व्हायरल झाला होता. या प्रकरणी अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंद्यातून एकाला पुणे पोलिसांनी अटक केली आहे. मात्र, मुलगा अल्पवयीन असल्याने त्याला उद्या आई-वडीलांसोबत विमान नगर पोलीस ठाण्यात हजर होण्यास सांगण्यात आलं आहे.

गौतमी पाटील हीचा चेंजिग रूम मधील कपडे बदलतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यावरून पुणे पोलीसांत तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर महिला आयोगाने या प्रकरणाची दखल घेत लवकरात लवकर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. दरम्यान, याप्रकरणी एका अल्पवयीन मुलाला अटक करण्यात आली आहे.

गौतमी पाटीलचा २४ फेब्रुवारीला पुण्यात कार्यक्रम होता. या कार्यक्रमादरम्यान एका व्यक्तीने गौतमी पाटीलचा कपडे बदलतानाचा व्हिडीओ शूट केला होता. त्यानंतर हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरलदेखील करण्यात आला होता. त्यानंतर गौतमीने विमानतळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button