TOP NewsUncategorizedताज्या घडामोडीमहाराष्ट्र

VIRAL: हो हे खरंय! लग्नाच्या पत्रिकेसह दारूची बाटली अन् चखना दिला; पाहा फोटो

लग्नाच्या पत्रिकेसह अक्षता देणं किंवा काही भेटवस्तू देणं याबाबत तुम्ही ऐकून असाल. पण लग्नाच्या पत्रिकेत दारूची बाटली आणि चखना दिला तर तुमचा विश्वास बसणार नाही, पण हे खरं आहे. महाराष्ट्रातल्या एका लग्नाची पत्रिका सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

लग्नाची पत्रिका उघडल्यानंतर आत एक आश्चर्यकारक भेटवस्तू दिसत आहे. या पत्रिकेच्या आत एक दारूची बाटली, चखना आणि मिनरल वॉटर ठेवलं आहे. ही घटना महाराष्ट्रातील चंद्रपूरमधील आहे. या पत्रिकेच्या पहिल्या पानावर गणपती बाप्पाचा फोटो आहे. दुसऱ्या पानावर लग्नाची तारीख, स्थळ आणि इतर तपशील आहेत. त्यानंतरच्या पानावर जे आहे ते पाहून तुम्हीसुद्धा हैराण व्हाल. या पत्रिकेचा पूर्ण व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

विशेष म्हणजे ही घटना अशा जिल्ह्याची आहे. ज्या ठिकाणी दारूबंदी आहे. या व्हिडीओ समोर आल्यानंतर दारूबंदीवरही प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. लोक या घटनेवर वेगवेगळ्या प्रकारे कमेंट्स करत आहे.

आजतकने दिलेल्या माहितीनुसार ही पत्रिका छापलेल्या माणसाला विचारल्यास त्यांनी सांगितले की, ”ही माझ्या मुलाच्या लग्नाची पत्रिका आहे. हे लग्न चंद्रपूरच्या एका हॉटेलमध्ये झाले. दारूबंदीमुळे या पत्रिका चंद्रपूर जिल्ह्यात वाटता आलेल्या नाहीत.”

पुढे त्यांनी सांगितले की, ”चंद्रपूरात अशा पत्रिका वाटण्यात आलेल्या नाही. नागपूरातील काही खास नातेवाईकांना या प्रकारच्या पत्रिका वाटण्यात आल्या होत्या. त्यापैकीच काहीजणांनी हा व्हिडीओ सोशल मीडियावर टाकला आणि हा व्हिडीओ व्हायरल झाला. चंद्रपुरात पत्रिकेसह ड्रायफ्रुट्स वाटण्यात आले होते.” यादरम्यान त्यांनी ड्रायफ्रुट्स असलेल्या पत्रिकासुद्धा दाखवल्या होत्या.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button