breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई

प्रताप सरनाईकांकडून कंगनाविरोधात हक्कभंग

विधानसभेत मांडला प्रस्ताव; प्रताप सरनाईकांच्या घरी पाकिस्तानी क्रेडिट कार्ड सापडल्याचा आरोप कंगनाने केला होता.

मुंबई | प्रतिनिधी

शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी अभिनेत्री कंगना रनौतवर गंभीर आरोप करत विधानसभेत हक्कभंग प्रस्ताव सादर केला आहे. प्रताप सरनाईक यांच्या घरी पाकिस्तानी क्रेडिट कार्ड सापडल्याचा आरोप कंगनाने केला होता. याविरोधात प्रताप सरनाईक यांनी आक्रमक भूमिका घेतली असून हक्कभंग प्रस्ताव सादर केला आहे.

सरनाईक म्हणाले की, ईडीच्या माध्यमातून माझी आणि कुटुंबीयांची संपूर्ण देशभरात बदनामी करण्याचा प्रयत्न आहे. अभिनेत्री कंगना रनौत यांनी माझ्याविरोधात खोटं ट्विट केलं. यामुळे कंगना रनौत तसंच त्याबद्दल बातम्या प्रसिद्ध करणाऱ्या इलेक्ट्रॉनिक, प्रिंट आणि सोशल मीडिया यांच्याविरोधात मी हक्कभंग दाखल केला आहे. कंगनाच्या ट्विटच्या आधारे ज्या मीडियाने खोट्या बातम्या प्रसिद्ध केल्या त्यांच्याविरोधातील हक्कभंग प्रस्ताव मान्य करावा अशी विनंती मी अध्यक्षांना केली आहे, अशी माहिती सरनाईक यांनी दिली.

गेल्या काही दिवसांपासून ईडीच्या अधिकाऱ्यांची चौकशी सुरु आहे. त्या चौकशीला सर्वतोपरी आम्ही सहकार्य करत आहोत. ज्यावेळी चौकशीची गरज असेल, शंका असतील त्या निरसन करण्यासाठी दोन तासात हजर राही असं मी ईडीच्या अधिकाऱ्यांना सांगितलं. दरम्यान, मनी लाँड्रिंग प्रकरणी शिवसेना आमदार प्रताप सरनाईक सध्या ईडीच्या फेऱ्यात अडकले आहेत. तसेच त्यांचा मुलगा विहंग सरनाईकही ईडीच्या रडारवर आहे. अशातच प्रताप सरनाईकांना आणखी एक धक्का बसणार आहे. प्रताप सरनाईक यांचे धाकटे पुत्र पुर्वेश सरनाईक यांनाही ईडीनं नोटीस बजावली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button