breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

वालीव पोलीस ठाण्यासमोर उभी करण्यात आलेल्या वाहनांना भीषण आग

मुंबई |

वसई-विरार शहरात एकापाठोपाठ एक अशा आगीच्या घटना समोर येत आहेत. आज दुपारी वसई पूर्व भागात वालीव पोलीस ठाण्याच्या समोर उभा करण्यात आलेल्या वाहनांना भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीत मोठ्या प्रमाणात वाहने जळून खाक झालेली आहेत. वसई पूर्व भागात वालीव पोलीस ठाणे परिसर आहे.

या पोलीस ठाण्याच्या समोरच जप्त केलेली व अपघातांमधील काही वाहने ठेवण्यात आली होती. दरम्याना आज(रविवार) भर दुपारी या वाहनांनी पेट घेतला. एका पाठोपाठ एक अशी ही वाहने उभी करण्यात आलेली असल्याने आग पसरत गेली व मोठा भडका उडाला. घटनेची माहिती अग्निशामक दलाच्या जवानांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळविले. आगीची तीव्रता अधिक असल्याने या आगीत जप्त केलेली जवळपास ३५ वाहने जळाली. आग नेमकी कोणत्या कारणामुळे लागली याचे कारण अजूनही समजू शकले नाही.

वाचा- वनमंत्री पदासाठी शिवसेना नगरसेवकाचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button