breaking-newsटेक -तंत्र

Redmi Note 9 pro स्मार्टफोन भारतात लॉन्च

शाओमीने दोन नवे स्मार्टफोन भारतीय बाजारात लॉन्च केले आहेत. शाओमीने हे स्मार्टफोन रेडमी नोट ९ सीरीजअंतर्गत लॉन्च केले आहेत. कंपनीने बहुचर्चित Redmi Note 9 pro स्मार्टफोन भारतात लॉन्च केला आहे. Redmi Note 9 Pro सह Redmi Note 9 Pro Max हा फोनही लॉन्च केला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या स्मार्टफोनची चर्चा होती. Redmi Note 9 सीरीजमध्ये रियर क्वाड कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. 

कंपनीने Redmi Note 9 Pro दोन प्रकारात बाजारात लॉन्च केला आहे. ४ जीबी रॅम, ६४ जीबी मेमरी आणि दुसरा ६ जीबी रॅम, १२८ जीबी मेमरी असणारे हे दोन फोन आहेत. ४ जीबी रॅम असणाऱ्या फोनची किंमत १२,९९९ रुपये आहे. तर ६ जीबी रॅम असणाऱ्या फोनची किंमत १५,९९९ रुपये इतकी आहे. 

Redmi Note 9 Pro फिचर्स  

– ६.६७ इंची डिस्प्ले
– फ्रन्ट-बॅक दोन्ही बाजूला गोरिला ग्लास ५ प्रोटेक्शन 
– Qualcomm SM7125 Snapdragon 720G प्रोसेसर
– चार कॅमेरा रियर सेटअप
– पहिला कॅमेरा ४८ मेगापिक्सल, दुसरा कॅमेरा ८ मेगापिक्सल आणि तिसरा-चौथा कॅमेरा २-२ मेगापिक्सल देण्यात आला आहे. 
– सेल्फी १६ मेगापिक्सल वाईट कॅमेरा 
– 5020 mAh बॅटरी

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button