breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणेमहाराष्ट्रमहिला दिन

मोशी येथे जागतिक महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रम; पंकज पवार यांचा पुढाकार

पिंपरी : संघर्ष संस्था, आदिशक्ती महिला मंडळ, श्री स्वामी समर्थ चॅरिटेबल ट्रस्ट आयोजित जागतिक महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून संत नगर मोशी प्राधिकरण मधील श्री स्वामी समर्थ मंदिराच्या प्रांगणामध्ये, महिलांसाठी विविध प्रकारच्या खेळाचे व मनोरंजनात्मक स्पर्धांचे आयोजन केले होते. या कार्यक्रमास सभोवतालच्या परिसरातील असंख्य महिलांची उपस्थिती लाभली. महिलांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला तसेच गप्पा गोष्टी करत खेळाचा आनंद लुटला.

कार्यक्रमाची सुरुवात श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती सर्व महिलांचे हस्ते करण्यात आली. मंडळाचे संस्थापक पंकज पवार यांनी मनोगत देताना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या तसेच स्त्री शक्तीचा महिमा अपरंपार आहे. अशा सर्वांना शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाचे आयोजन सामाजिक कार्यकर्त्या प्रीती पवार, शामल चेल, जयश्री झोंबाडे, जयश्री अभंग व इतर सर्व महिलांनी केले. सुरेखा आल्हाट यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button