breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीदेश-विदेश

अयोध्यानगरी सजली! आजपासून राम मंदिरात विविध कार्यक्रम आणि विधींना सुरुवात

Ayodhya Ram Temple | अयोध्येत २२ जानेवारी रोजी होणाऱ्या राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी धार्मिक विधींना आज, मंगळवारपासून प्रारंभ होणार आहे. आज १६ जानेवारीपासून रामलल्लाची म्हणजेच प्रभू श्रीरामाच्या बालस्वरूप मूर्तीची पूजा सुरू होणार आहे. तसेच आजपासून राम मंदिरात विविध कार्यक्रम आणि विधींना सुरुवात झाली आहे.

१८ तारखेला श्रीरामाची मूर्ती गाभाऱ्यामध्ये स्थापित केली जाणार असून धार्मिक विधी २१ जानेवारीपर्यंत सुरू राहतील, अशी माहिती राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र मंदिर ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी सोमवारी दिली. प्राणप्रतिष्ठेच्या मुख्य सोहळ्यात २२ तारखेला दुपारी १२.३० वाजता सुरुवात होईल. हा विधी एक वाजेपर्यंत चालेल. संपूर्ण कार्यक्रम ६५ ते ७५ मिनिटांचा असेल, अशी माहिती राय यांनी दिली. या सोहळ्याचा मुहूर्त वाराणसीमधील ज्ञानेश्वर शास्त्री द्रविड यांनी काढला आहे. ज्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे ती पाषाणात घडविलेली असून १८ जानेवारीला ही मूर्ती गाभाऱ्यात ठेवली जाईल.

हेही वाचा    –    ‘दावोस दौऱ्यात महाराष्ट्राचे एक ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे ध्येय पूर्ण होणार’; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 

१६ जानेवारी ते २२ जानेवारी दरम्यान होणार हे औपचारिक विधी :

  • १६ जानेवारी : प्रयासचित आणि कर्मकुटी पूजन
  • १७ जानेवारी : मुर्तीचा परीसर प्रवेश
  • १८ जानेवारी : (संध्याकाळी) : तीर्थपूजन, जलयात्रा आणि गांधधिवास
  • १९ जानेवारी : (सकाळी) : औषधाधिवास, केसराधिवास, घृताधिवास
  • १९ जानेवारी : (संध्याकाळी) : धनाधिवास
  • २० जानेवारी : (सकाळी) : शर्कराधिवास, फलाधिवास
  • २० जानेवारी : (संध्याकाळी) : पुष्पाधिवास
  • २१ जानेवारी : (सकाळी) : मध्याधिवास
  • २२ जानेवारी : (संध्याकाळी) : शैयाधिवास.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button