ताज्या घडामोडीमुंबईराजकारण

उत्तर प्रदेशातील सर्व्हेंनी उडवली भाजपची झोप

एक्झिट पोलमुळे वाढली विरोधकांची चिंता

मुंबई : लोकसभा निवडणुकीचा निकाल अवघ्या काही तासात जाहीर होणार आहे. त्यामुळे देशातील चित्र स्पष्ट होणार आहे. मात्र, एक्झिट पोलमुळे विरोधकांची चांगलीच झोप उडाली आहे. एक्झिट पोलनुसार देशात भाजपची सत्ता येणार आहे. असं असलं तरी भाजपला आपल्या हक्काच्या बालेकिल्ल्यात मोठा फटका बसताना दिसत आहे. उत्तर प्रदेशात भाजपची पिछेहाट होताना दिसत आहे. उत्तर प्रदेशात यावेळी इंडिया आघाडीला मोठं यश मिळताना दिसत आहे. विशेष म्हणजे उत्तर प्रदेशात राम मंदिर उभारल्यानंतरही भाजपला फायदा मिळताना दिसत नाहीये. त्यामुळे भाजपची चिंता वाढण्याची शक्यता आहे.

उत्तर प्रदेशात लोकसभेच्या एकूण 80 जागा आहेत. या जागांचा विविध चॅनेल्स आणि संस्थांनी सर्व्हे केला आहे. त्यातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. डीबी लाइव्हने केलेल्या सर्व्हेत भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएला फक्त 46-48 जागा मिळताना दिसत आहेत. तर इंडिया अलायन्सला 32 ते 34 जागा मिळण्याचा अंदाज आहे. तसं झालं तर भाजपसाठी हा मोठा सेट बॅक असणार आहे. ज्या प्रदेशात राम मंदिराची उभारणी केली, तिथेच भाजपला मोठा फटका बसताना दिसत आहे. डीबी लाइव्हच्या सर्व्हेने मोदी लाट आणि योगींची जादूही यूपीत नसल्याचं दाखवून दिलं आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि समाजवादी पार्टीचे नेते अखिलेश यादव यांच्या मेहनतीला फळ मिळणार असल्याचं या सर्व्हेतून दिसत आहे. या दोन्ही नेत्यांनी उत्तर प्रदेशात जीवाचं रान केलं होतं. लोकांशी संपर्क साधला होता. रॅलींवर भर दिला होता. त्यामुळे मतदारांनीही त्यांच्या पारड्यात मतांचं दान टाकल्याचं या एक्झिट पोलमधून दिसून येतंय. मात्र, प्रत्यक्ष निकालाच्या दिवशीच खरं चित्र स्पष्ट होणार आहे.

दुसरीकडे उत्तर प्रदेशातील जागांचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या सर्व्हेनुसार एनडीएला 66 जागा मिळणार असून इंडिया आघाडीला 14 जागा मिळताना दिसत आहेत. यात भाजपला 62, काँग्रेसला 3 आणि समाजवादी पार्टीला 11 जागा मिळताना दिसत आहेत. आरएलडीला दोन जागा मिळण्याची शक्यता आहे. मायावती यांच्या बहुजन समाज पार्टीला एकही जागा मिळताना दिसत नाहीये.

सर्व्हेत इंडिया आघाडी वरचढ
डीबी लाइव्हच्या सर्व्हेत इंडिया आघाडीला मोठा फायदा होताना दिसत आहे. या सर्व्हेनुसार एनडीएला 207 ते 241 जागा मिळणार आहेत. तर इंडिया आघाडीला 255 ते 290 जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

एक्झिट पोल काय म्हणतात?
न्यूज नेशनच्या एक्झिट पोलनुसार उत्तर प्रदेशात भाजपला 67 जागा मिळतील. तर इंडिआ आघाडीला 10 आणि इतरांना तीन जागा मिळणार आहेत. रिपब्लिक भारत (मॅट्रिज)च्या एक्झिटपोलनुसार भाजपला यूपीत 69 ते 74 जागा मिळतील. तर इंडिया आघाडीला 6 ते 11 जागा मिळणार आहेत.

एनडीएला यूपीत एनडीएला 68 ते 74 जागा मिळतील. तर इंडिया आघाडीला 6 ते 12 जागा मिळतील. एक्झिट पोलमध्ये केवळ एकट्या भाजपलाच 64 ते 70 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवला आहे. अपना दल आणि रालोदला प्रत्येकी दोन दोन जागा मिळतील असा अंदाज आहे. तर सुभासपा पार्टीला एक जागा मिळेल असा अंदाज आहे. याशिवाय समाजवादी पार्टीला 5 ते 11 जागा मिळतील. तर काँग्रेसला एक जागा मिळण्याची शक्यता आहे. बसपाला यावेळीही एकही जागा मिळणार नसल्याचं चित्र आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button