ताज्या घडामोडीराष्ट्रिय

अमेरिकेकडून रशियन इंधन आयातीवर निर्बंध

वॉशिंग्टन| रशिया-युक्रेन युद्धामुळे एकीकडे भीषण मंदी आणि महागाईचे सावट आहे. तर दुसरीकडे तेलाच्या किंमती वाढण्याची प्रचंड चिंता आहे. युक्रेनवर हल्ला केल्यानंतर अमेरिकेने रशियाची आर्थिक कोंडी करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. अमेरिकेने आधीच निर्बंध लावले होते. त्यात आता मंगळवारी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी रशियाच्या गॅस, कच्च्या तेलाच्या आयातींवर बंदी घालण्याची घोषणा केली. या निर्बंधांमुळे रशियाला मोठा आर्थिक झटका बसेल असे म्हटले. तर बायडन यांच्या या निर्णयामुळे आता आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरावर काय परिणाम होतील, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

रशिया हा जगभरात कच्च्या तेलाचा पुरवठा करणाऱ्या देशांपैकी एक आहे. त्यामुळे अमेरिकेकडून रशियाच्या तेल आयातीवर बंदी घातल्याचा परिणाम दरांवर होण्याची भीती आहे. भारतालादेखील कच्च्या तेलाच्या आयातीसाठी अधिक पैसे मोजावे लागू शकतात. परिणामी इंधन दर वाढू शकतात. तसेच डॉलरच्या तुलनेत रुपया आणखी कमकुवत होण्याची भीती आहे. महत्त्वाचे म्हणजे युरोपीयन देश कच्चे तेल आणि नैसर्गिक वायूसाठी रशियावर अवलंबून आहेत. त्यामुळे युरोपीयन देश अमेरिकेच्या या निर्बंधांना साथ देण्याची शक्यता कमी असल्याचे म्हटले जात आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button